शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमध्ये मुगाचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:58 IST

मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.

ठळक मुद्देहमीपेक्षा तीन हजारांनी कमी : हेच का अच्छे दिन? शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या हंगामात खरिपाचा पाऊस उशिरा आल्यामुळे दोन महिने कालावधीच्या मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र कमी झाले. पीक फुलोऱ्यावर आल्यावर व शेंगा भरण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने सरासरी उत्पादन घटले. बँका कर्ज नाकारत असल्यामुळे अडचणीतील शेतकºयांनी मूग बाजारात विक्रीसाठी आणला असता, व्यापाºयांनी भाव पाडले आहत. यंदाच्या खरिपासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारा ११ जुलै रोजी मुगाला ६,९७५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यापेक्षा कमी दर अपेक्षित नसताना प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये ३८०० ते ४३०० रुपये यादरम्यान भाव बाजार समितीत मिळत आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे मुगाचे सरसरी एकरी दोन क्विंटल उत्पादन झाले. यामध्ये पेरणी, बियाणे, खत, निंदन , डवरणी, सोंगणी व काढणीचा खर्च गृहीत धरता, उत्पादनखर्चाच्या निम्मे रक्कमदेखील शेतकºयांच्या हाती पडत नसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये आता मुगाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. याला बाजार समिती संचालक मंडळासह जिल्हा उपनिबंधकांचा अटकाव नसल्यामुळे व्यापारी शिरजोर झाले आहेत.उत्पादनात घट, भाव कमीयंदाच्या खरिपात जिल्ह्यात २२ हजार ३०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. यामध्येही १८ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या दर्यापूर तालुक्यात आहे. त्यामुळे यंदा मुगाच्या उत्पादनात घट होणार, हे वास्तव आहे. मागणी जास्त आणि उत्पादनात घट यामुळे भाववाढ अपेक्षित असताना हमीभावापेक्षा तीन हजार रूपयांनी मुगाची विक्री होत आहे. अमरावती बाजार समितीमध्ये ३५०० ते ५००० या भावाने मंगळवारी मुगाची खरेदी झाली.शासकीय खरेदी केव्हा?बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या आत शेतमाल विकला जात असेल, तर शासनाद्वारे आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी होते. यंदा मूग बाजारात हमीभावापेक्षा तीन हजार रुपये कमी दराने विकला जात आहे. त्यामुळे नाफेडद्वारे खरेदीची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनस्तरावर त्याबाबत हालचाली नाहीत. अनेक जिल्ह्यांमधून बाजार समित्यांनी पत्र दिले असताना शासनाने अद्याप केंद्राला प्रस्ताव पाठविलेला नसल्याची माहिती आहे.