शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मूग, उडदाची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:56 IST

यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच मूग व उडीद हमीपेक्षा कमी भावाने विक्री केले जात असल्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.

ठळक मुद्देनाफेडद्वारा पाच केंद्रांवर खरेदी : खरेदीपूर्व शेतकºयांना ‘एसएमएस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच मूग व उडीद हमीपेक्षा कमी भावाने विक्री केले जात असल्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे. त्यामुळे नाफेडद्वरा हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर तीन आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. नोंदणीचा व खरेदीपूर्व‘ एसएमएस’ शेतकºयांना पाठविण्यात येणार आहे.यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग व उडदासारखे पीक उद्ध्वस्त झाले. यामधून जे पीक वाचले ते आता मातीमोल भावाने विकले जात आहे. वास्तविकता यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने हमीभाव जाहीर केले आहेत. त्यानुसार मुगाला ५,५७५ यामध्ये २०० रूपये बोनस, तर उडदाला ५,४०० रूपये यामध्ये २०० रूपयांचा बोनस असे हमीभाव आहेत. प्रत्यक्षात शेकºयांचा माल बाजारात आल्यावर एक ते दीड हजार रूपये प्रतीक्विंटलने व्यापाºयांनी खरेदी सुरू केली. बाजार समित्यांचे व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याने आता सहकार व पणन विभागाने नाफेडद्वारा तीन आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार व चांदूररेल्वे या पाच केंद्रांवर मंगळवारपासून शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. खरेदीचे पूर्व शेतकºयांना ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येणार आहे.नोंदणीसाठी ही माहिती आवश्यकनोंदणीसाठी शेतकºयांनी खरीप हंगामातील पीक-पेºयानुसार सात-बारा उताºयाची मूळप्रत, आधारकार्ड झेरॉक्स, बँकखाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी माहितीसह आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी क्रमांकाचा ‘एसएमएस’ शेतकºयांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.यंदाच्या हंगामातील मूग व उडदाची खरेदी केंद्रे नाफेडची मंजुरी मिळताच सुरू करण्यात येतील. प्रथम पाच केंद्रांवर खरेदी करण्यात येईल. यासाठी शेतकºयांनी तीन आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी करने महत्त्वाचे आहे.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधकआॅनलाईन नोंदणीसाठी संबंधित खरेदी विक्री संघाच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. केंद्रांच्या ठिकाणी हे कर्मचारी शेतकºयांची कागदपत्रे घेऊन आॅनलाईन नोंद करतील. याचा शेतकºयांना एसएमएस येईल.- अशोक देशमुख,जिल्हा मार्केटिंग अधिकारी