शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा हाऊसफुल्ल; २० हजार पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:23 IST

विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याचे तुषार अंगावर घेत पर्यटकांनी संततधार पावसाचा आनंद घेतला. अनेक पॉइंटवर वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देवाहनांच्या रांगा : आल्हाददायक वातावरण, सलगच्या दोन सुट्यांमुळे उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याचे तुषार अंगावर घेत पर्यटकांनी संततधार पावसाचा आनंद घेतला. अनेक पॉइंटवर वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते.दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे चिखलदरा पर्यटनस्थळाच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपसूकच घाट वळण्याच्या नागमोडी रस्त्यावर वळू लागली. विकेन्डला २० हजारांवर पर्यटक आल्याने नगरपालिकेला १ लाख २० हजारांपेक्षा अधिकचा महसूल मिळाला. पर्यटकांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, लेखापाल प्रमोद वानखडे, प्रदीप जोशी, दुर्गेश पाल, अंतुलाल कास्देकर, नगरपालिकेचे अन्य कर्मचारी पर्यटक कर नाक्यावर तैनात होते.रस्ता खचल्याची अफवाचिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणारा मार्ग खचल्याची अफवा रविवारी दिवसभर सोशल मीडियावर होती. प्रत्यक्षात ते छायाचित्र पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरकडे जाणाºया रस्त्याचे होते. त्याचा संबंध अनेकांनी चिखलदरा पर्यटनस्थळाशी जोडून अफवा पसरवली. यासंदर्भात ‘लोकमत’ पुणे आवृत्तीत प्रकाशित छायाचित्र सत्यता दर्शविणारे ठरले. याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे शंकांचे निरसन केले.वाहतूक ठप्पशनिवार-रविवारी सुटीच्या दिवसांत शेकडो पर्यटक चिखलदऱ्याला भेटी देतात. रविवारी रात्रीपर्यंत चिखलदºयात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी सुरू होती. नगरपालिकेच्या पर्यटक नाक्यासह येथील भीमकूंड, देवी पॉइंट, गाविलगड किल्ला, मोझरी पॉइंट, पंचबोल, हरिकेन पॉईंट, वनउद्यान, जत्राडोह यासह इतर पॉईंटवर पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास चार हजारांवर कार तर दोन हजार पर्यटक दुचाकीवर आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा