मुख्य अभियंता सुचित्रा गुजरसह अधिकारी,कर्मचारी फिल्डवर
अमरावती : थकीत वीज देयकांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. एवढेच नाही तर स्वत: मुख्य अभियंता अधिकारी कर्मचाऱ्यासह वीजपुरवठा खंडित करण्यासाठी फिल्डवर उतरल्या आहेत. त्यांच्या नेतुत्वात परिमंडलात ११ मार्च पासून वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.
परिमंडळातील घरगुती ,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ३ लक्ष ७१ हजार ग्राहकांकडे सुमारे २४७ कोटी १५ लक्ष रूपये थकीत आहेत.वीज ग्राहकांना महावितरणच्या आर्थीक परिस्थितीची माहिती देवून थकीत विज देयकांचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार महावितरण केले आहे. परंतु महाविरणच्या आवाहनाला न जुमता वीजेची देयके थकीत असलेल्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांना आता महावितरणच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बॉक्स
महावितरणची परिस्थिती बिकट
वीज बिल भरायचे नाही तर वीज पुरवठा नाही अशी भूमिका महावितरण घेतली आहे. महावितरणने वीज ग्राहकांना संकटाच्या काळातही अखंडित सेवा देण्याला प्राधान्य दिले,एवढेच नाही तर सध्यास्थितीत महावितरणचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने,उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतीरिक्त पदभार देत रात्रं-दिवस अखंडित वीजपुरवठा करण्यात येतो. वर्षभरात थकलेल्या वीज देयकांमुळे महावितरणचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
बॉक्स
अशी आहे थकबाकीदार रक्कम
६४९७ औद्योगिक ग्राहकांकडे २५ कोटी ८५ लाख
२८४१२ वाणिज्यिक ग्राहकांकडे २६ कोटी ८४ लाख
३ लक्ष ३६ हजार २२८ घरगुती ग्राहकांकडे १९४ कोटी ४६लाख
बॉक्स
अडथळा आणल्यास कारवाई
महावितरणच्या कारवाई दरम्यान कोणी अडथळा आणत असेल किंवा महावितरण कर्मचाऱ्यांना मारहानीचे प्रकार घडले तर त्यांच्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचे निर्देशही मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.