शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद, खासदार नवनीत राणा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 3:59 PM

ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.

ठळक मुद्देराणा दाम्पत्याच्या घरासमोर गर्दीकार्यकर्त्यांसोबत खासदार नवनीत राणांची घोषणाबाजीपोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता हा पुतळा बसविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला. यावरून आता चांगलच राजकारण पेटलं असून खासदार नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह त्यांच्या घरासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राजापेठ उड्डाणपुलावर राजमाता यांच्या जयंतीदिनी आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारीच्या मध्यरात्री कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. मात्र, महापालिकेनं ती नाकारली व पुतळा हटवला. यानंतर, राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. 

दरम्यान, राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. तर, ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.

१२ जानेवारीला आमदार रवी राणा यांनी  महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. तर त्यापाठोपाठ काल रात्री शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. अमरावती प्रकरणानंतर दर्यापूरमधील पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा