शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे महावितरण कार्यालयावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:59 IST

शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयावर आंदोलन छेडले. मुख्य अभियंत्यासमोर तासभर शहरातील तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला व अधिकाºयांनासुद्धा धारेवर धरले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना धारेवर धरले : मुख्य अभियंत्यासमोर वाचला तक्रारींचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयावर आंदोलन छेडले. मुख्य अभियंत्यासमोर तासभर शहरातील तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला व अधिकाºयांनासुद्धा धारेवर धरले.प्रेरणानगरातील आदित्य तळकित मृत्यूप्रकरणी कुटुंबाला तातडीने चार लाखांची मदत आणि भावाला त्वरित शासकीय नोकरीत समावून घ्यावे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. आठ दिवसांत रक्कम देण्यात येईल. नोकरीसंदर्भाचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांना पाठवू, असे आश्वासन मुख्य अभियंत्यांनी दिले.याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, माजी महापौर वंदना कंगाले, माजी उपमहापौर विलास महल्ले, नगरसेविका शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, माजी कुलगुरु गणेश पाटील, वसंतराव साऊरकर, बी.आर. देशमुख, भैयासाहेब निचत, किशोर शिरभाते, दीपक गुल्हाने, सुरेश रतावा, संतोष देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य दगावला त्या डीबीजवळ महावितरणने तातडीने चेनलिंक फेन्सिंग केले आहे.शुक्रवारी चौकशी अहवालआदित्यच्या मृत्यूनंतर महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी जनमित्र सुरेश किटुकले यांना तडकाफडकी निलंबित केले होते. सहायक अभियंता दीपक बोंडे व प्रभारी सहायक अभियंता प्रफुल्ल देशमुख यांना शो-कॉज बजावली होती. त्यासंदर्भाचा चौकशी अहवाल शुक्रवारी गाडगेनगर विभागाच्या विद्युत निरीक्षक राखी नागपुरे सादर करणार आहेत.