शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धा चेनस्नॅचरच्या ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंगळवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्या. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत रपेट करणाऱ्या महिला या चेनस्नॅचरच्या ‘सावज’ बनल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून लक्षात येत आहे. त्यामुळे या महिलांनी फिरताना सतर्क राहणे आता गरजेचे झाले आहे.राठीनगरातील रहिवासी पद्मा लक्ष्मीनारायण गांधी (७२) मंगळवारी ...

ठळक मुद्देचेनस्नॅचिंगच्या दोन घटना : महिलांनो, सावधान! पहाटे फिरताना राहा सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंगळवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्या. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत रपेट करणाऱ्या महिला या चेनस्नॅचरच्या ‘सावज’ बनल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून लक्षात येत आहे. त्यामुळे या महिलांनी फिरताना सतर्क राहणे आता गरजेचे झाले आहे.राठीनगरातील रहिवासी पद्मा लक्ष्मीनारायण गांधी (७२) मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास परिसरात फिरत होत्या. त्या एका महिलेशी चर्चा करीत असताना दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी मुख्य रस्ता कुठे आहे, असे विचारले. पद्मा यांनी हाताने मुख्य रस्ता दाखविताच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांनीही तपासकार्य सुरू केले.राठीनगरातील घटनेत तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन तरुणांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे पाहता येऊ शकते. कोतवाली व गाडगेनगर हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये दोन्ही आरोपी एकच असल्याचे निदर्शनास येत आहे. ही ईराणी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पोलीस तपासाची बतावणी करून दागिने लंपासकलावती भगीरथ शर्मा (७०, रा. बच्छराज प्लॉट) सकाळी ६.४५ वाजता सतिधाम मंदिरातून बालाजी मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. रॉयली प्लॉट स्थित दवा बाजारासमोरून त्या जात असताना दोन अज्ञात इसमांनी आवाज दिला. समोर पोलीस चेकिंग करीत आहे; तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून आमच्याकडे द्या, अशी बतावणी त्यांनी केली. कलावती शर्मा यांनी गळ्यातील १५ ग्रॅ्रमचे दागिने काढून एका कागदी पुडीत ठेवले. पुडी पाहतो म्हणून इसमांनी ती हाती घेतली आणि पळ काढला. या घटनेची तक्रार कोतवाली पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.