शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आई-मुलाला सासरच्यांनी जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 01:40 IST

तालुक्यातील नरसिंगपूर येथे विवाहितेचा चिमुकल्या मुलासह जळून मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सासरच्या मंडळीने तिला मुलासह जाळून मारल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमाहेरच्या मंडळीचा आरोप : दर्यापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील नरसिंगपूर येथे विवाहितेचा चिमुकल्या मुलासह जळून मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सासरच्या मंडळीने तिला मुलासह जाळून मारल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सारिका प्रवीण बायस्कर (२५) व विघ्नेश प्रवीण बायस्कर असे मृताचे नाव आहे. नरसिंगपूर येथे राहत्या घरी शुक्रवारी सकाळी ५ च्या सुमारास एका खोलीत या मायलेकांनी शुक्रवारी जाळून घेतल्याची घटना घडली. या घटनेच्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले. मृतक सारिका व तिच्या मुलाला नागपूर येथे खाजगी रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र आई व मुलगा हा जास्त प्रमाणात जळल्यामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.चांदुरबाजार तालुक्यातील जसापूर बंड येथील सारीकाचा विवाह नरसिंगपूर येथे प्रवीण नामदेव बायस्कर यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित असताना अचानक कुठेतरी घरामध्ये वाद निर्माण झाला. यातूनच सासरच्यांनी आई व मुलाचा जाळून मारल्याचा आरोप सारीकाच्या वडिलांनी केला आहे. सासरच्यांनी वारंवार माहेरचा मंडळीकडून पैशाची मागणी करत होते. पण ती मागणी काही वेळा पूर्ण सुद्धा करण्यात आली. मात्र त्यांची मागणी आणखी वाढतच होती. ती पूर्ण न केल्यामुळे अखेर माझ्या मुलीला व नातू विघ्नेश याला जावाई वारंवार मारहाण करीत होते, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे. जाळून घ्यायच्या अगोदर शुक्रवार रोजी सकाळी पाचच्या दरम्यान तिचे वडील दिवाकर देविदास बंड यांना त्यांची मुलगी सारिका हिचा फोन आला व त्याच दिवशी तिला तिच्या पती प्रवीण बायस्कर, त्यांचे मोठे भाऊ राजेश बायस्कर व त्याची पत्नी स्वाती राजेश बायस्कर यांनी सारिका व तिचा मुलगा विघ्नेश यांच्यावर रॉकेल टाकून त्यांना जाळून टाकले, असा आरोप मुलीचे वडील दिवाकर देविदास बंड त्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला मंगळवारी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन दर्यापूर पोलिसांनी प्रवीण बायस्कर व त्यांचे मोठे भाऊ राजेश बायस्कर व त्याची पत्नी स्वाती राजेश बायस्कर यांच्याविरुद्ध कलम ३९८ अ, ३०४ ब, ३४ भादविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस