शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळ चव्हाळ्यात सर्वाधिक मतदार

By admin | Updated: January 28, 2017 00:25 IST

तालुक्यात ८ पं.स गण व ४ जि.प. गटाचा समावेश असून यात एकूण ९५ हजार ५९६ मतदार आहेत.

पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांच्या वाऱ्या : नांदगाव तालुक्यात ९५ हजार मतदार नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात ८ पं.स गण व ४ जि.प. गटाचा समावेश असून यात एकूण ९५ हजार ५९६ मतदार आहेत. प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारानी पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी सुरु केली आहे. लोणी गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून यात लोणी, फुलआमला, दाभा, दहीगाव, टाकळी बु. पाळा, बेलोरा हिरापूर ग्रापंचा समावेश आहे. येथे ११ हजार ५६१ मतदार आहेत. धानोरा (फसी) गण सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव असून यात धानोरा फसी, सार्सी, वाटपूर, वढुरा, सिद्धनाथपूर, शेलुगुंड, हिवरा बु., ढवळसरी ग्रापंचा समावेश आहे. यात १० हजार ९९३ मतदार आहे. जनुना गण नामाप्र स्त्रियांसाठी राखीव असून यात जनुना, जळू, जामगाव, जावरा, खिरसाना, सावनेर, कोठोळा, भगुरा, माहुली चोर ग्रापंचा समावेश आहे. यात ११ हजार ६२९ मतदार आहेत. फुबगाव गण हा नामाप्रसाठी राखीव असून यात फुबगाव, वाघोडा, म्हसला, सातरगाव, कंझरा, येणस, एरंडगाव, अडगाव बुचा समावेश आहे. यात ११ हजार ४८३ मतदार आहे. धानोरा (गुरव) गण अनुसूचित जाती स्त्रिसाठी राखीव असून यात धानोरा गुरव, शिरपूर, मोखड, नांदसावंगी, रोहणा, पिंपळगाव बैनाई, कोदोरी, खंडाळा खुर्द, पहूर, कणी मिर्झापूर, एकलासपूर, पळसमंडळ या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात १२ हजार ६७६ मतदार आहे. मंगरूळ चव्हाळा पं.स. गण अनुसूचित जातीसाठी राखीव असून यात मंगरुळ चव्हाळा, चिखली वैद्य, शिवणी, धानोरा शिक्रा, येवती, धामक, बेलोरा, शेलूनटवा, सुलतानपूरचा समावेश आहे. यात १३ हजार १७५ मतदार आहे. वाढोणा रामनाथ पं.स. गण सर्वसाधारण स्त्रियासाठी राखीव असून यात वाढोणा, पापळ, कोव्हाळा जटेश्वर, लोहगाव, पिंप्री निपाणी, सारखरा, काजना ग्रापंचा समावेश आहे. यात १२ हजार ३९३ मतदार आहे. सालोड गण सर्वसाधारणकरिता असून यात सालड, खानापूर, वेणी गणेशपूर, शिवरा, पिंपळगाव निपाणी, खेड पिंप्री, पिंप्री गावंडा, पुसनेर, वडाळा या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात ११ हजार ६८६ मतदार आहे. लोणी जि. प. गट सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखी असून यात लोणी व धानोरा फसी पं.स. गणातील ग्रापंक्षेत्राचा समावेश आहे. यात २२ हजार ५५४ मतदार आहेत. फुबगाव गट सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव असून यात जनुना व फुबगाव पं.स. गणातील ग्रापंचा समावेश आहे. यात २३ हजार ११२ मतदार आहेत.मंगरुळ चव्हाळा गट अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव असून यात धानोरा गुरव व मंगरूळ चव्हाळा पं.स. गणातील ग्रापंचा समावेश आहे. यात २५ हजार ८५१ मतदार आहे. वाढोणा रामनाथ गट अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव असून यात वाढोणा व सालोड गणातील ग्रामपंचायतींच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात २४ हजार ७९ मतदार आहेत. उपरोक्त आकेडवारीनुसार मंगरूळ चव्हाळा गटात सर्वाधिक मतदार आहेत. हे मतदार निर्णायक ठरू शकतात. (तालुका प्रतिनिधी)