शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी नगराध्यक्षपदासाठी आजपासून रणधुमाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 12:56 IST

नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होईल. त्यासाठी मोर्शी नगरपालिकेच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मोर्शी : नगराध्यक्षपदासाठी २९ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होईल. त्यासाठी मोर्शी नगरपालिकेच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नगराध्यक्ष शीला अशोक रोडे यांचे १० जून रोजी आजाराने निधन झाले. तेव्हापासून नगराध्यक्षपद रिक्त होते. त्या भाजपच्या उमेदवारीवरजिंकल्या होत्या.

आता पुन्हा एकदा ते पद मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच होत आहे. मात्र, राज्यात तीन पक्षांची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत एकच उमेदवार दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निवडून जाणाऱ्या नगराध्यक्षपदाचा कालावधी हा दोन वर्षांचा असल्याने व नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपतर्फे अनेक महिला दावेदारी करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविलेल्या व मागील निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झालेल्या मेघना मडघे यासुद्धा रिंगणात असतील. भाजप तर्फे माजी नगराध्यक्ष रेशमा उमाळे, छाया ढोले, रुपाली राऊत, माजी नगराध्यक्ष दिवंगत शीला रोडे यांच्या कन्या अश्विनी वानखडे, दीपाली भडांगे व सुनीता अढाऊ यांनीसुद्धा निवडणूक लढविण्याचा मनोदय केला आहे. ही निवडणूक अवघ्या पंचवीस दिवसावर येऊन ठेपली आहे.

शहरात नवे समीकरणराज्यात महाराष्ट्र विकास आघाडीव्या निमिताने नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. मोर्शी विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा याच आघाडीत सहभागी असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मोशी नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेतर्फे प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने, नगरसेविका क्रांती संजय धावडे (चौधरी) यांची नावे चर्चेत आहेत.