शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोर्शीचे आमदार झाले दर्यापूरचे जावई...; साखरपुडा आटोपून देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 22:43 IST

Amravati News मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. त्यांचा बुधवारी दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्याशी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी साखरपुडा झाला.

अमरावती : मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. त्यांचा बुधवारी दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्याशी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी साखरपुडा झाला. एकीकडे साखरपुड्याची लगबग तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर साखरपुडा आटोपून आ. भुयार मुंबईसाठी रवाना झाले.

मोनाली राणे या बीएएमएस आहेत. त्यांचे वडील दिलीपराव राणे हे जिल्हा परिषद निवृत्त शिक्षक आहेत. यावेळी भुयार परिवार व राणे परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी व आमदार देवेंद्र भुयार यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. साखरपुडा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार देवेंद्र भुयार यांना फोन आला, ‘तुम्हाला उद्या मुंबईला अधिवेशनाला यायचं आहे.’ आमदारांनी आता माझा साखरपुडा सुरू आहे, असे सांगताच या वार्तेचा सूर बदलला आणि अजित पवार यांनी आ. भुयार यांची फिरकीही घेतली. अखेरीस मी आजच रात्रीच्या विमानाने मुंबईला निघतो, असे त्यांनी सांगितले. आमदार देवेंद्र भुयार नागपूरहून मुंबईकरिता बुधवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले.

टॅग्स :marriageलग्न