शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी, धारणी तालुक्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:30 IST

मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे साहित्य इतरत्र हलविण्यात आले.

ठळक मुद्देदमयंती नदीचे पाणी घरांमध्ये सिपना, गडगा, तापी ओव्हरफ्लो

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : गेल्या आठवडाभर विश्रांतीला गेलेल्या पावसाने मोर्शी तालुक्यात बुधवारी अतिवृष्टीच्या स्वरूपात हजेरी लावली. तीन तासांच्या पावसाने मोर्शी शहरात आठ ते नऊ फूट पाणी भरले होते. यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले.मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे साहित्य इतरत्र हलविण्यात आले. काली परिसरातील दिलीप वानखेडे, मिलिंद ढाकुलकर ते सरकारी दवाखान्याच्या बाजूला आंबेडकर चौकापासून माळगे बिछायत केंद्रापर्यंत असलेल्या रस्त्याच्या बाजूची सर्व घरांमध्ये पाणी जमा झाले. पावसाचा जोर दुपारी ४ पर्यंत कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्री मार्केटसमोरील रस्त्यावर तीन फूट पाणी असल्यामुळे गुजरी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद होती. यादरम्यान ८५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.१५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवानामोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले असून, १५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे काही कुटुंबांना नगर परिषदेच्या शाळांत हलविण्यात आले.अप्पर वर्धा ८१ टक्केअप्पर वर्धा धरणाची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जलाशयाच्या पाण्याची पातळी ८१.३९ टक्के झाली आहे. जलाशयात ३४१.२८ मीटर उपयुक्त व ४५९.१० मीटर एकूण पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या निर्धारित क्षमतेला केवळ १.२२ मीटर कमी असल्याने धरणाची सर्व १३ दारे केव्हाही उघडू शकतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर