शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माकडाचा उपद्रव, महिलेच्या एका पायाला २० टाके, दुसरा फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माकड प्रजातीतील लंगूरने बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्थानिक काँग्रेसनगरात उपद्रव घातल्यामुळे एक महिलेला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले. महिलेच्या एका पायाला २० टाके पडले असून, दुसरा पाय फ्रॅक्चर झाला आहे.छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला. चावा घेत रक्तबंबाळ केले. यानंतर लंगूरने जोरात उडी घेतल्याने त्यांचा पाय फ्रॅ क्चर झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तब्बल १०० ते १२५ किलो वजनाचे हे लंगूर असल्याची माहिती वनविभागाने दिली. ट्रँक्विलायझरने बेशुद्ध केल्यानंतर लंगूरला जंगलात सोडण्यात आले. महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, वनरक्षक अमोल गावनेर यांनी या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.रेस्क्यू चमूने मिळविले नियंत्रणकाँग्रेसनगरात लंगुरांनी उपद्रव सुरू केला. सेवानिवृत्त शिक्षिकेला गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे रेस्क्यू पथक आणि महापालिका पशू विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. उपद्रव घालणाºया लंगूर माकडाला जेरबंद करुन इतरांना हाकलून लावले. नगरसेवक बबलू शेखावत यांनी रेस्क्यू चमूला पाचारण केले.अन्न, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाजलंगूर माकड हे सहसा जेथे अन्न, पाणी मिळेल अशाच देऊळ, मंदिर भागात संचार करतात. मात्र, उन्हाळ्यात घराच्या छतावर पापड, अन्नधान्य वाळू घालणे याकडे सुद्धा लंगूर आकृष्ट झाले असावे. हल्ली शहरी भागात निंबाच्या झाडाला निंबोळ्या लागल्या असून, त्या खाण्यासाठी ते आलेत, अशी माहिती उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.