शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील नवाबच्या संरक्षणार्थ कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 11:08 IST

अमरावती जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत.

ठळक मुद्देवीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारजंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी 

अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमत अमरावती:जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. शेतकुंपणाला वीजप्रवाही तारा सोडू नये, याबाबत शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. वीजप्रवाहित तारा निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना नोटिसात आहेत. वाघोबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग करण्यात येत आहे.जंगलालगत असलेल्या शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करतात. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी आपापल्या शेतात पीक संरक्षणासाठीच नव्हे, तर काही शेतकरी तारांच्या कुंपणामध्ये वीज प्रवाहदेखील सोडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बळी जातो. मागील आठवड्यात कुंपणातील वीज प्रवाहाने वाघ आणि बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली होती. त्यामुळेच का होईना, पण या संघर्षामुळे कधी मानवाचा, तर कधी वन्यजिवांचा हकनाक बळी जात आहे. अख्ख्या महाराष्टत ठिकठिकाणी वन्यजिवांचा विद्युत करंटमुळे जीव बळी गेला. त्यामुळे छुप्या मार्गानेही घातपातांच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन चांदूररेल्वे, चिरोडी वनपरिक्षेत्राच्यावतीने जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात आल्या आहेत. शिवाय नियमित जंगल गस्त करून वन्यप्राण्यांच्या हालचालीवर दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही रेंजच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या वनकर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.नवाबच्या विशेष संरक्षणार्थ उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे अपरात्री जंगलात गस्त घालतात. ट्रॅप कॅमेरे तपासून त्याच्या हालचाली टिपतात.वीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारशेतकुंपणात वीजप्रवाह सोडल्यास व करंट लागून वन्यप्राणी ठार झाल्यास वनविभाग स्वतंत्र गुन्हा दाखल करणार आहे. यासोबत अवैधरीत्या वीजचोरीचा गुन्हा तसेच वीज कंपनी त्यांच्या नियमानुसार गुन्हा दाखल करणार असल्याने वीजप्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी सुरक्षिततेसाठी रात्रीला व दिवसाला जंगलानजीकच्या शेतीची तपासणी करीत असून शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात येत आहेत. दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वाघाच्या अस्तित्वामुळे पोहरा-चिरोडीच्या जंगलात हे प्रमाण कमी आहे, हेही तितकेच खरे आहे. ही वस्तुस्थिती असली तरी वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने आणखी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल