शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

पिकांचे निरीक्षण आता उपग्रहाद्वारे

By admin | Updated: November 25, 2014 22:46 IST

दरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे

पैसेवारी पद्धती होणार कालबाह्य : धोरणासाठी समितीची रचनाजितेंद्र दखने - अमरावतीदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक-पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली जाणार आहे. दरवर्षी पीक-पाण्याच्या पाहणीवरून अडचणी निर्माण होतात. महसूल विभागाच्या आणेवारी, पैसेवारी काढण्याच्या पद्धती कालबाह्य होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीसह राज्यभरातील पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. राज्यात सातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक-पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी अद्यापही नजर आणेवारी, सुधारित आणेवारी व अंतिम आणेवारी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. पण बऱ्याचदा यासंदर्भातील अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास विलंब होतो व त्याअभावी शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अशक्य होते. त्यामुळे पीक पाण्याच्या स्थितीची मोजणी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने केल्यास यासंदर्भातील माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत कार्यपद्धती व धोरण निश्चित करण्यासाठी मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान, महसूल, कृषी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करून ही समिती या संदर्भात अंतिम कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. आणेवारी प्रक्रियेत बदलाचे धोरणसध्या महसूल विभागामार्फत दरवर्षी १५ नोव्हेंबरदरम्यान विविध जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात येते. ही आणेवारी प्रत्यक्ष महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यामार्फत केली जात असल्याने या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो. त्यामुळे या प्रक्रियेत आमुलाग्र बदल करण्याचे नवीन भाजप सरकारणे धोरण स्वीकारले आहे.शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञानाचा वापरदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया किचकट ठरत आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाने निर्णय घेताना विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देताना विलंब होत असून यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून आता उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.अहवालानंतर होणार शिक्कामोर्तबसातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. या समितीच्या अभ्यासानंतर सादर केल्या जाणाऱ्या अंतिम अहवालाच्या आधारे हा नवा प्रयोग अंमलात आणला जाणार आहे.