शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतील पैसे उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:09 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा सिलसिला अजूनही सुुरूच आहे.

ठळक मुद्देचोरीचा ‘सिलसिला’ सुरूच: दोघांना २ लाख ५८ हजारांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा सिलसिला अजूनही सुुरूच आहे. सोमवारी गाडगेनगर व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन खातेदारांच्या खात्यातून २ लाख ५८ हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी काढल्याचे उघड झाले. त्यामुळे आणखी किती दिवस सिलसिला चालणार, असा वैताग नागरिक व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याच्या घटना घडल्या. त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मात्र, गुन्हेगारांपर्यंत ते पोहोचले नाहीत. स्टेट बँकेकडूनही चौकशी सुरू असल्याचा गवगवा केला जात आहे. तपासणी करून खातेदारांची रोख परत केली जाईल, अशी ग्वाही बँक अधिकारी देत आहेत. मात्र, अशा पद्धतीने खातेदारांचे पैसे काढले जात असल्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेला गालबोट लागले आहे. बँक व्यवहार गोपनीय चालतात, मात्र, अशा घटनांमुळे स्टेट बँकेची गोपनियता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँकेच्या एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे खातेदारांच्या खात्याची माहिती लीक झाली आणि नेमके तेच सायबर गुन्हेगाराने हेरल्यामुळे खातेदारांची फसवणूक झाली. स्टेट बँकेच्या हलगर्जीपणाचे गंडांतर बँक खातेदारांवर आले असून, आता एसबीआयच्या खात्यात पुन्हा पैसे टाकण्याविषयी नागरिक साशंक आहेत. मागील काही महिन्यांत १८ जणांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांनी रिकामे केल्यामुळे असा प्रकार आपल्यासोबतदेखील घडू शकतो, अशी भीती स्टेट बँकेच्या खातेदारांना आहे. त्यामुळे एसबीआयचे अनेक खातेदार खात्यातून पैसे काढण्यासाठी धाव घेत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून स्टेट बँकेत गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.बॅक खात्यातून पैसे काढण्याची सर्वाधिक प्रकरणे स्टेट बँकेच्या खातेदारांसोबत घडली आहेत. राठीनगर, बडनेरा व कोतवाली हद्दीतील एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी पाचव्या महिन्यात खातेदारांची माहिती मिळविली होती. मे महिन्यात पहिला गुन्हा उघड झाला होता. सायबर गुन्हेगार माहितीच्या आधारे खात्यातून परस्पर रक्कम काढत आहेत. त्यांना अनेकांच्या एटीएमचे पिन ज्ञात झाले आहेत. त्यामुळे स्टेट बँकेच्या खातेदारांनी एटीएमचे पिन त्वरित बदलविणे गरजेचे आहे. पिन बदलून घेण्याचे आवाहन बँकेकडूनही संबंधित अधिकाºयांनी केले आहे.सीसीटीव्हीतील टायमिंग तपासणारसायबर गुन्हेगारांनी राठीनगर, बडनेरा व कोतवालीच्या हद्दीतील एसबीआयच्या एटीएममध्ये स्किमिंग केल्याचा संशय पोलिसांना आहे. अमरावतीच्या सायबर टीमने गुडगावातील १० एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून, ते मंगळवारी अमरावतीत पोहोचले. गुडगावातील एटीएममधून पैसे विड्रॉल करणारे व अमरावतीमधील एटीएममध्ये स्किमिंग करणारे अशा दोन्ही बाजू पोलीस तपासणार आहे. पैसे विड्रॉल करताना दिसणारे चेहरे व स्किमिंग करणाºया चेहरे कोणाचे आहेत, त्यांचा अमरावती व गुडगावशी संबंध काय, आदी बाबींचा उलगडा लवकरच होण्याचे संकेत आहे. फुटेजची पाहणी करू, अशी माहिती सायबर सेलच्या पोलिसांनी दिली.यांच्या खात्यातून रोख गायबगाडगेनगर हद्दीतील रहिवासी एक महिला सोमवारी बँकेच्या कामानिमित्त राठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये गेली होती. त्यांनी पासबूक स्टेटमेंट तपासून पाहिले असता, त्यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार व ८० हजार असे एकूण २ लाख ४० हजारांची रोख विड्रॉल झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सुखदेव झिंगुजी श्रुंगारे (रा. गणेशनगर, बडनेरा) यांच्या भारतीय स्टेट बँकेतील पेंशन खात्यातून १८ हजारांची रोख राज्याबाहेरच्या डुंडहेरा येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे आढळून आले.गुडगाव येथील दहा एटीएम फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यांची तपासणी करण्यात येईल. पैसे काढताना दिसणारे व स्किमिंग करणाºयांचे चेहरे स्पष्ट झाल्यावर आरोपी निश्चित होईल. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल.- कांचन पांडे,सहायक पोलीस निरीक्षक