शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाचा मसुदा शिवचरणी अर्पण करून प्रतापगडावर शिवजयंती सोहळा साजरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याची नव्याने ओळख देणारा किल्ले प्रतापगड हा अखंड शिवऊर्जेचा स्रोत आहे. ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाचा मसुदा शिवचरणी अर्पण करून प्रतापगडावर शिवजयंती सोहळा साजरा केला. शिवकार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद त्यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यानिमित्ताने ॲड. ठाकूर बोलत होत्या.प्रतापगडावरील वातावरण प्रेरणादायीसूर्याची तेजस्वी-सोनेरी किरणे, मन प्रफुल्लित करणारे वातावरण, आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा नाद, भगव्या-पिवळ्या फुलांची आरास, शिवपालखी सोहळा, शिवध्वजारोहण, भवानीमातेचा अभिषेक आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,’ असा एकच जयघोष असा किल्ले प्रतापगडावरील हा शिवजयंती सोहळा अंगात नवचैतन्य निर्माण करणारा असाच ठरला. किल्ले प्रतापगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाला आधुनिकतेचा विचार देणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवजयंतीनिमित्त आज तो क्षण पुन्हा जगता आला, हे सर्व प्रेरणादायी आहे, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

विरोधकांना तगडे प्रत्युत्तरकेवळ स्मारकांच्या मागून राजकारण न करता, समाजकारणाच्या माध्यमातून महिला धोरणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांचे हे प्रयत्न शिवरायांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी ठरणार आहेत. महिला धोरणाची अंमलबजावणी म्हणजे शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत पोहोचतील असे हे कार्य असल्याचे ॲड. ठाकूर म्हणाल्या. शिवकार्याची ओळख ही स्वकार्यातून दाखवून देत हा कार्यक्रम म्हणजे अमरावतीतील शिवाजी महाराज पुतळा वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना तगडे प्रत्युत्तर मानले जाते. 

 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीYashomati Thakurयशोमती ठाकूर