शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग, सख्याहरीला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:22 IST

शिकवणी वर्ग संपल्यावर सायकलने धोतरखेडा येथे जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा सख्याहरीने पाठलाग करून विनयभंग केला. त्या विद्यार्थिने त्याचा प्रतिकार करीत आरडाओरड केल्यावरून नागरिकांनी त्या रोडरोमिओला पकडून यथेच्छ चोप दिला.

ठळक मुद्देनागरिकांची ठाण्यावर धडक : इदगाह परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शिकवणी वर्ग संपल्यावर सायकलने धोतरखेडा येथे जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा सख्याहरीने पाठलाग करून विनयभंग केला. त्या विद्यार्थिने त्याचा प्रतिकार करीत आरडाओरड केल्यावरून नागरिकांनी त्या रोडरोमिओला पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी परतवाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. रंगोली लॉनजवळील इदगाह परिसरात १५ जून रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली.शेख राजा शेख सलाम (३०, मुगलाईपुरा, परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गुजरी बाजार चौकात भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३५४, ३५४ अ, ३२३,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली, तर अन्य दोघांविरुद्ध १५१ अन्वये कारवाई करण्यात आली. परतवाडा धामणगाव मार्गावरील नर्सरीनजीक तिला थांबवून अश्लील भाषेत तो बोलला. विद्यार्थिनीने प्रतिकार केल्याने त्यांच्यात लोंबाझोंबी झाली. कशीबशी सुटका करून पळू लागली. हे पाहून आरोपीने तिला दगड फेकून मारला. तो दगड हातावर लागल्याने ती रक्तबंबाळ झाली.जखमी अवस्थेत तिने नागरिकांची मदत मागितली. नागरिकांनी आरोपीची धुलाई केली.मजनंूचा बंदोबस्त कराशहरालगतच्या परिसरातील खेड्यांतून विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालय व शिकवणीसाठी परतवाड्यात येतात. काही कापड व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठान, दवाखाने आदी ठिकाणी काम करण्यासाठी येतात. त्या महिला -मुलींच्या ये-जा करण्याच्या वेळेत हे टवाळखोर त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असल्याच्या घटना शहरात वाढत आहे. रस्त्यावरून एकट्या मुलीला ओढत नेण्यापर्यंत त्या टवाळखोरांची मजल गेली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.नागरिक ठाण्यावरसदर मुलीने परतवाडा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. नागरिकांचा लोंढा ठाण्याकडे जात असल्याचे पाहून शहरातील इतर नागरिक ठाण्यावर धडकले. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस