शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांच्या लुटमारीतील आरोपींविरूद्ध ‘मोक्का’

By प्रदीप भाकरे | Updated: April 5, 2023 16:38 IST

कलम वाढ : टोळीप्रमुखांसह चार जणांना अटक

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल आठ लाख रुपयांच्या वाटमारी प्रकरणातील सात जणांच्या टोळीविरूद्ध ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. १८ मार्च रोजी दाखल गुन्ह्यात मोक्काअन्वये कलम वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.

रविनगर येथील क्रिपालसिंग ठाकोर हा व्यापाऱ्यांकडून संकलित केलेले ८ लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना आरोपींनी दुचाकींनी येऊन त्याच्याकडून ती रक्कम हिसकावून पळ काढला होता. भुतेश्वर चौक भागातून जात असताना त्याला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १८ मार्च रोजी जबरी चोरी व गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता. यात एकुण सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी आरोपी शेख मुन्नु शेख सलीम (३२, रा.चांदणी चौक, अमरावती), ईलीयास अली अहेमद अली (२४, बिसमिल्ला नगर अमरावती), सैय्यद समिर ऊर्फ गोविंदा सैय्यद जमीर (३०, रा. ताजनगर अमरावती) आणि तेजस संजय धोटे (२१, नमुना गल्ली) या चौघांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान यातील टोळीप्रमुख शेख मुन्नु शेख सलीम हा स्वत:सह टोळीतील सदस्यांचे आर्थिक लाभाकरीता वैयक्तीक व संघटितपणे स्वतः व टोळीतील संदस्यामार्फत गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. ती टोळी सक्रिय आहे. या टोळीतील सदस्यांविरुद्ध शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला बरेच गुन्हे नोंद आहेत. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या परवानगीने मुळ गुन्हयात महराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम ‘मोक्का’ नुसार कलम वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांपुर्वी बडनेरा पोलिसांनी रोहन वानखडे खून प्रकरणात सहा आरोपींविरूद्ध मोक्का लावला होता.

यांनी केली कामगिरी फत्ते

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या नेतृत्वात राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे, पोउपनि काठेवाडे, अंमलदार सागर सरदार, छोटेलाल यादव, ईश्वर चक्रे, नरेश मोहरील, मनिष कळंबे, रवि लिखीतकर, सागर भजगवरे, विक्रम देशमुख, उमेश उईके, विकास गुडधे यांनी ही कामगिरी केली. याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, ते देखील मोक्काच्या अंतर्गतच आरोपी होतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीArrestअटकMCOCA ACTमकोका कायदाRobberyचोरी