शहरातील विश्रामगृह ते जायंट्स चौक, रिंग रोड, ॲप्रोच रोडवर शेकडो मोकाट गायी, म्हशी रस्त्यावर बस्तान मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे; तर अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक मुक्या जनावरांचा अपघातात मृत्यू झाला तर वाहनचालकही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु यावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करावी; तसेच या जनावराच्या मालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. रस्त्याने चालणेही कठीण झाले; तर वाहनचालकाकडून जनावराला दुखापत झाली; तर जनावरांची मालक येऊन वाहनचालकांची तक्रार करून कारवाही करतात किंवा वारेमाप रक्कम उकळतात आणि पोलीस कारवाईसुद्धा करतात; यामुळे निर्दोष वाहनचालकांना नाहकच त्रास सहन करावा लागतो. याकडे पोलीस आणि नगर परिषदेच्या प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मोकाट जनावरे देतात अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST