शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्यमित्रांनी तयार केले आॅफलाइन मोबाइल अ‍ॅप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 14:54 IST

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता व आजाराविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी तिवसा व वलगाव येथील आरोग्यमित्रांनी पुढाकार घेत आॅफलाइन मोबाइल अ‍ॅप तयार केले.

सूरज दहाट/तिवसा (अमरावती) :  महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता व आजाराविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी तिवसा व वलगाव येथील आरोग्यमित्रांनी पुढाकार घेत आॅफलाइन मोबाइल अ‍ॅप तयार केले. त्यामुळे इंटरनेट नसतानाही आपल्या अँड्रॉइड मोबाइलवर काही क्षणातच संपूर्ण माहिती मिळणार आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यमित्र मिलिंद गजभिये, प्रमोद बोराळकर, राजेश पुनसे, सतीश व-हाडे, मंगेश पुनसे यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णांच्या सेवेसाठी आॅफलाइन मोबाइल अ‍ॅप तयार केले. यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व माहिती आहे.

राज्यातील रुग्णालये, सुविधा, आजाराविषयी माहिती व संपूर्ण पत्ता या मोबाइल अ‍ॅपवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, आॅफलाइन असल्याने या अ‍ॅपला इंटरनेटची आवश्यकता नाही. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दीड लाखांच्या मर्यादेत वेगवेगळ्या ९७१ आजारांसाठी रुग्णालयांमार्फत मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. एखाद्या रुग्णालयाने योजनेंतर्गत संलग्न रुग्णालयाची माहिती व जास्तीत जास्त लाभार्थी रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असून, गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल. शासनाकडे आम्ही हे अ‍ॅप सादर करून रुग्णांच्या सेवेसाठी खुले करणार आहोत,असे आरोग्यमित्र मिलिंद गजभिये यांनी सांगितले.