शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मतदान केंद्रांत मोबाईल बंदी

By admin | Updated: April 21, 2015 00:04 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. ..

१०० मीटरपर्यंत प्रतिबंध : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जरोशन कडू तिवसाग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. मतदान केंद्रांवर प्रवेश करतेवेळी मतदारांना त्यांचे भ्रमणध्वनी बाहेरच ठेवावे लागणार आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटरच्या आत उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी प्रचार करीत आहे, असे निर्दशनास आल्यास त्याला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. मतदान केंद्राचे १०० मीटरच्या आत प्रचार करणे निवडणूक कायद्याने गुुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास वारंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. उमेदवाराचा निवडणूक मंडप केंद्रापासून २०० मीटरपलीकडे असेल. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात एखाद्या व्यक्तीकडून मतदानास अडथळा होईल, असा ध्वनीक्षेपक लावण्यात आला असेल तर मतदान केंद्राध्यक्ष तो बंद करु शकतो. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची छायाचित्रे छायाचित्रकाराला घेता येईल. मतदार नसलेल्या कुठल्याही व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी मिळू शकत नाही. मतदारांना ने-आण करणाऱ्या वाहनांवर नजरमतदारांची ने-आण करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आयोगाची करडी नजर राहणार आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्याचवेळी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अन्वये १३३ अंतर्गत उमेदवारा- विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मतदार केंद्राच्या आत शस्त्र नेल्यास दोन वर्षे कारावास व दंडाची तरतूद केली आहे. आक्षेपित मतांकरिता दोन रुपये शुल्कमतदार यादीत नाव असताना मतदान प्रतिनिधीने मतदारावर आक्षेप घेतल्यास त्या आक्षेपासाठी दोन रुपये केंद्राध्यक्षाकडे जमा करावे लागणार आहे. चौकशीअंती आक्षेप सिध्द न झाल्यास अमानत रक्कम जमा केली जाणार आहे. कडेवर मूल असलेल्या महिलांना प्राधान्यमतदान केंद्रावर महिला, पुरुष व मतदारांच्या स्वतंत्र रांगा राहतील.अपंग व कडेवर मूल असलेल्या महिला मतदारांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. मुकबधीर मतदारांसमवेत इतर प्रतिनिधींना पाठवू नये, असे आदेश आयोगांनी दिले आहेत. केंद्राध्यक्ष, प्रतिनिधींना घ्यावी लागणार शपथलोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२८ मधील तरतुदीनुसार मतदानाची गुप्तता राखण्यासाठी तरतूद असल्याने संबंधित प्रतिज्ञापत्राचे वाचन करुन मतदान अधिकारी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांना शपथ द्यावी लागणार आहे. प्रत्येक केवळ एकच प्रतिनिधी केंद्राच्या आत राहणार आहे.