शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी केली काँक्रीट रस्त्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:10 IST

जिल्हा क्रीडा संकुलासमोरील रस्त्यावर योग्य पद्धतीने क्यूरिंग न केल्याने या रस्त्याचे भवितव्य काय, यासंदर्भाचे 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचीही उपस्थिती : वाहतुकीत अडसर न आणण्याबाबत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा क्रीडा संकुलासमोरील रस्त्यावर योग्य पद्धतीने क्यूरिंग न केल्याने या रस्त्याचे भवितव्य काय, यासंदर्भाचे 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली. याची दखल घेऊन अमरावती मतदारसंघाचे आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी तेथे भेट देऊन सदर रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामाचा अधिकाºयांकडून आढावा घेतला. कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्यात.मुंबई येथील जेपीई इन्फ्रास्टक्चरने पंचवटी ते बडनेरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. हा रस्ता अत्याधुनिक मशीनद्वारे बनविण्यात येत आहे. त्याची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, उपअभियंता मिलिंद पाटणकर, उपअभियंता आशुतोष शिरभाते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उपस्थित होते.अभियंत्यांनी आ. देशमुख यांना रस्त्याच्या कामाची माहिती दिली. परंतु, या ठिकाणी क्रीडा संकुल असल्याने शहरातील अनेक मुले तेथे विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येतात. त्यांना क्रीडा संकुलात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून यावे लागत आहे. ही कसरत त्यांना रोज करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करताना योग्य नियोजन नसल्याने गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नागरिकांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काम करताना नागरिकांना वेठीस धरू नये, अशा सूचनाही यावेळी आमदार सुनील देशमुख यांनी केल्यात.रस्ता काँक्रीटीकरणाचे काम चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे, याची खबरदारी घ्या, असेही आ. देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा करताना सांगितले. यावेळी अभियंत्यांसह नागरिकांची गर्दी जमली होती.शेड बांधून अतिक्रमण करू नयेयेथील क्रीडा संकुलात टायर कंपनीचे शोरूम आहे. त्याने फुटपाथवर अतिक्रमण करून टिनाचे शेड उभारले आहे. बाजूलाच गॅरेज असून, दुचाकी रस्त्यापर्यंत उभ्या राहतात. यामुळे फूटपाथ गडप झाला आहे, हे देशमुख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मेकॅनिकला अतिक्रमण न करण्याबाबत बजावले. कारवाई करण्याची तंबीदेखील दिली. रस्त्याचे काम सुरू असल्याने लोकांना रस्त्यावरून चालता येत नाही. किमान त्यांना फूटपाथवरून तरी चालू द्यावे, असे सदर शोरूमच्या संचालकाला आ. देशमुख यांनी सुनावले.