शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 11:04 IST

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली.

अमरावती : मोर्शी - वरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. आमदार भुयार यांच्यावर पक्ष विचारसरणीला छेद देण्यात येत असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पक्षातून नारळ मिळाल्याच्या काही वेळानंतर भुयार यांनी फेसबुकवर 'धन्यवाद' म्हणत एक पोस्ट केली असून ही पोस्ट सर्वत्र चर्चेत राहिली.

जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास अल्पावधीत गाठणारे देवेंद्र भुयार यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी नाराज असल्याची विश्वसनीय माहिती आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा धक्कादायक पराभव करून विक्रम नोंदविणारे आमदार देवेंद्र भुयार यांना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गुरुवारी भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले.

देवेंद्र भुयार यांनी फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट

गत काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्याही निर्णयाला आमदार भुयार हे जुमानत नव्हते. आमदार देवेंद्र भुयार हे महाविकास आाघाडी समर्थक म्हणून आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात ‘राजकीय’ बेबनाव झाला आहे. याचाही फटका आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बसत असल्याची माहिती आहे.

किंबहुना आमदार भुयार हे स्वाभिमानीचे अमरावती जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांना ते दुय्यम वागणूक देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आमदार भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा असा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला होता. त्यावरून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीAmravatiअमरावती