शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:03 IST

Amravati News वरूड तहसील कार्यालयात शिरून तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी व माईक फेकून मारून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देशासकीय कामकाजात अडथळा, माईक फेकून मारल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : वरूड तहसील कार्यालयात शिरून तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी व माईक फेकून मारून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भुयार आमदार नसतानाचे सन २०१३ मधील हे प्रकरण आहे. जिल्हा न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी हा निर्णय दिला.(Devendra Bhuyar)

विधीसूत्रानुसार, २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन तहसीलदार राम लंके हे वरूड तहसील कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले. बाजार समितीमधील शासकीय ज्वारी केंद्र बंद का आहे, फोन का काटला, अशी विचारणा करून भुयार यांनी आपल्याला अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यांनी माईकदेखील फेकून मारल्याची तक्रार लंके यांनी नोंदविली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

युक्तिवादादरम्यान, शासकीय कामकाजात अडथळा हा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना तीन महिने सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, भादंविचे कलम २८४ अन्वये दोन महिने सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास व कलम ५०६ अन्वये तीन महिने सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. तीनही शिक्षा एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर नुकसानभरपाई म्हणून राम लंके यांना १० हजार रुपये देण्याचा आदेशदेखील न्यायालयाने दिला. अभियोक्ता सुनित घोडेस्वार यांनी सरकारी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय