फोटो पी १८ चिखलदरा
चिखलदरा : तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. प्रत्येक पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपले सदस्य निवडून आल्याचा दावा करीत असल्याने सरपंच निवडणुकीनंतर ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात हे चित्र स्पष्ट होणार आहे. १६४ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात ४३१ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले होते.
त्यात माजी सभापती रजनी बेलसरे, माजी उपसभापती पुण्या येवले, राजेश सेमलकर, शिवा काकड, विनायक कवडे, साधुराम पाटील, देवीदास कोगे यांचे वर्चस्व पणाला लागले होते. ते सर्व निवडून आले. तालुक्यातील शहापूर, काजलडोह, सेमाडोह, सलोना, दहेंद्री, बागलिंगा, बिबा, मोथा, जामलीवन, बारुगव्हाण, डोमा, चिखली, आडनदी, कोहाना, रायपूर, एकताई, माखला, खटकाली, अढाव, काकादरी, आमझरी, खिरपाणी, तारूबांदा या ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक तेरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले असल्याचा दावा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी केला, तर ग्रामपंचायतींवर प्रहारचा झेंडा फडकल्याचा दावा ‘प्रहार'चे तालुका संपर्कप्रमुख विनय लांजेवार यांनी केला. आठ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचे तालुका अध्यक्ष हिरुजी हेकडे यांनी सांगितले. तर प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. मोथा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आणण्यात साधुराम पाटील यांना यश आले आहे.
-----------