कबड्डी स्पर्धा : ६५ किलो वजनी गटातही चुरस
टाकरखेडा मोरे (अंजनगाव सुर्जी) : टाकरखेडा मोरे येथे जय शिवाजी क्रीडा मंडळ व व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ५२ किलो वजन गटात मिराजी क्रीडा मंडळ पिंपरी खुर्द या संघाला पहिले पारितोषिक देण्यात आले.
प्रफुल्ल निर्मळ यांच्याकडून पहिल्या विजेत्या संघाला १५ हजार रुपये, गाडगेबाबा मंडळ मूर्तिजापूर द्वितीय विजेता संघ ठरला. त्यांना मेघश्याम धुमाळे यांचेकडून ११ हजार रुपये रोख व तृतीय विजेता ठरलेल्या मातोश्री मंडळ पिंगळाई यांना सुषमा तायडे यांच्याकडून सात हजार रुपये देण्यात आले. तसेच ६५ किलो वजन गटात गाडगेबाबा क्रीडा मंडळ मूर्तिजापूर, हनुमान क्रीडा मंडळ टवलार व तरुण उत्साही मंडळ चिंचोली रहिमापूर येथील संघ अनुक्रमे तीन क्रमांकावर राहिले. १५, ११ व ७ हजारांचे पारितोषिकदेखील त्या संघाला देण्यात आले.
--------