शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अल्पवयीन गुंडांची दादागिरी,भावंडांवर हल्ला

By admin | Updated: October 27, 2016 00:12 IST

अल्पवयीन गुंडांनी दादागिरी करीत भावंडांवर लाठ्या-काठ्यासह लोखंडी सळाखीने प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांमध्ये नगरसेविकेच्या पुत्राचाही सहभाग : न्यू स्वस्तिकनगर चौकातील घटना, टवाळखोरांमुळे नागरिक हैराण अमरावती : अल्पवयीन गुंडांनी दादागिरी करीत भावंडांवर लाठ्या-काठ्यासह लोखंडी सळाखीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना नवाथेनगरजवळील न्यू स्वस्तिकनगर चौकात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये हल्लेखोरांमध्यील एक अल्पवयीन आरोपी हा नगरसेविकेचा मुलगा असून त्यांच्या गुंडगिरीबाबतच्या परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. या हल्ल्यात हेमंत मेंटागे (३५) व त्यांचा लहान भाऊ नितीन ऊर्फ नरेंद्र मेटांगे हे दोघेजण जखमी झाले.न्यू स्वस्तिकनगर चौक हा टवाळखोरांचा अड्डा बनत चालला आहे. दररोज या चौकातील चायनिज विक्रेते व शितपेयांच्या दुकानांमध्ये प्रेमीयुगलांची गर्दी असते. त्याच ठिकाणी काही टवाळखोर युवक मद्यप्राशन सुद्धा करतात. त्यांच्या गुंडगिरीचा त्रास परिसरातील जनतेलाही होतो. यासंदर्भात अनेकदा त्या भागातील नागरिकांनी आक्षेप घेऊन याटवाळखोर युवकांचा बंदोबस्त करण्याबाबत पोलिसांना कळविले आहे. मात्र, त्याकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. मद्यप्राशन करून मंगळवारी रात्री हेमंत मेटांगे यांच्या इलेक्ट्रीकल प्रतिष्ठानाच्या शेजारी असलेल्या मेडिकल प्रतिष्ठानच्या शटरला काही युवकांनी लाथा मारण्यास सुरुवात केली होती. शटरवर दगडफेक करून हेमंत मेटांगे यांच्या दुकानातील आकाशदिव्यांची फेकफाकही हे गुंड करीत होते. त्यामुळे हेमंत यांनी त्या दोन अल्पवयीन मुलांना हटकले. मात्र, शिरजोरी दाखवित त्यांनी हेमंतसह नितीनला बेदम मारहाण सुरु केली. मारहाणीचा प्रतिकार हेमंत व नितीन यांनी केला असता त्या अल्पवयीन गुंडांनी आणखी काही युवकांना बोलावून गोंधळ घातला आणि हेमंत यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने हल्ला केला. या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ झाले होते. तरीही त्याने दोन अल्पवयीन हल्लेखोरांना पकडून ठेवले. मात्र, त्यांच्या साथीदाराने दोघांचीही सुटका केली. हल्लेखोरांनी हेमंत मेटांगे यांच्या दुकानातील साहित्याची फेकफाक करून त्यांच्या गल्ल्यातील ५० ते ६० हजारांची रोकड सुद्धा लंपास केली. याघटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि आरोपींचा शोध सुरु केला. जखमी हेमंत याला उपचाराकरिता इर्विनला नेले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जखमींच्या सहकाऱ्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणात पोलिसांनी सात ते आठ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ४२७, सह १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयिनांसह मनीष गु्ल्हाने, विजय थोरात व पवन लेंडे या पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.दादागिरीला नागरिक कंटाळले नवाथेनगरात गुंडप्रवृत्तीच्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे गुंड न्यु स्वस्तिकनगर चौकातील मार्केटमध्ये बसून टवाळखोरी करतात. ये-जा करणाऱ्या युवतींची छेड सुद्धा काढतात. असे अनेक प्रकार उघड झाले आहेत. या टवाळखोरांना कोणी हटकल्यास ते शिरजोरी करून त्यांच्यावरच हल्ला करतात. या युवकांविषयी नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या टवाळखोरांची मुजोरी आणखी वाढली आहे. गैर कायदेशिर मंडळी जमवून सात ते आठ युवकांनी हा हल्ला चढविला आहे. त्यांच्यावर राईटस गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे. - शिशीर मानकर, पोलीस निरीक्षक.