अद्यापही तोडगा नाही : विविध विभागांत गप्पांचा फडअमरावती: जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेट पेमध्ये सुधारणा करा, प्रशासकीय बदल्याबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करा, या मागण्यांसाठी सलग चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कामे होत नसल्याने कामाविनाच परत जावे लागत आहे.एवढेच नव्हेतर अधिकाऱ्यांनाही कामे करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.सोमवारी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने त्याच्या विविध मागण्यासाठी उद्यानात एक सभा घेवून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले कर्मचारी कर्तव्यावर हजर असले तरी प्रशासकीय कुठलेच काम करित नसल्याने केवळ अनेक विभागात गप्पा सुरूच असल्याचे दिसून आले. राज्य शासन सहायक प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायकांच्या 'ग्रेड पे'मध्ये सुधारणा करणे, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबचे अन्याय कारक धोरण रद्द करणे, कर्मचाऱ्यांचे जॉबकार्ड व कर्तव्यसूची निश्चित करणे, स्पर्धा परीक्षांसाठी लिपिकांना परीक्षेस बसण्यास ४५ वर्षे वयोमर्यादा सवलत मिळावी आदी मागण्या मान्य करणार नाही तो पर्यत आता आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने निर्धार केला आहे. या लेखणीबंद आंदालनाचा प्रभाव मिनीमंत्रालयाच्या प्रशासकीय कामकाजावर दिसून आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन किती दिवस चालणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. विविध कामांसाठी नागरिकांची कामे खोळबली आहेत. १८ जुलै रोजी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तथा लिपिकवर्गीय संघटनेने जिल्हाध्यक्ष पकंज गुल्हाने, संजय येवूतकर, संजय राठी, समिर र्चौधरी, राजेश रोंघे, श्रीनिवास उदापुरे, योगेंद्र देशमुख, गजानन कोरडे, तुषार पावडे, निलेश तालन, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, चंद्रशेखर टेकाडे, विजय कविटकर, संजय खडसे, सुदेश तोटावार, प्रशांत धर्माळे, अमोल कावरे ऋषीकेश कोकाटे, इश्र्वर राठोड, रूपेश देशमुख, पराग सोनोने, अर्चना मानकर, ज्योती गावंडे, चंचल सोळंके, आत्राम, प्राजक्ता मशिदकर, ललिता तिरमारे अर्चना लाहूडकर, शिल्पा काळमेघ, विरेंद्र रोडे, लिलाधर नांदे, अशोक थोटांगे, समिर लेंडे, जयेश वरखेडे, अनूप टाले, शैलेश वाडी, सुजित पेठे तुषार वडतकर, राजू झाकडे, आशिष बामनगांवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मिनिमंत्रालयात लेखणीबंदने प्रशासकीय कामांना 'ब्रेक'
By admin | Updated: July 19, 2016 00:16 IST