अमरावती : राज्य आणि देशात काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त शासन असावे, यासाठी रिपाइं महायुतीत सामील झाली. त्यानुसार सत्तावाटपाचा लेखी करारही झाला. अनेक आव्हाने स्वीकारुन रिपाइंने भाजप, सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जनतेनेसुद्धा या निर्णयाचे स्वागत करुन लोकसभा, विधानसभेत कौल दिला. त्यामुळे रिपाइं मंत्रिपद हक्कानुसार मागत असून लाचारी नव्हे असे, रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ विभागीय कार्यकर्ता चिंतन शिबिराला ेते आले असता आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले यांनी येत्या ५ एप्रिल रोजी मुंबईत रिपाइंचा राज्यव्यापी मेळावा होत असल्याचे सांगताना विदर्भावर सातत्याने अन्याय केला जात असल्याची बाब स्पष्ट केली. विदर्भावर आर्थिक अन्याय होत असल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
मंत्रिपद हा रिपाइंचा हक्कच
By admin | Updated: February 19, 2015 00:19 IST