शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांड : गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली प्रतीक्षाच्या कुटुंबीयांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:22 IST

अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 

अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 

नेमके काय आहे  घटना ?‘माझी होणार नसशील तर..!’ हा चित्रपटात शोभणारा खुनशी इशारा खरा करणा-या राहुल भडला गुरुवारी ( 23 नोव्हेंबर ) रात्री पोलिसांनी मूर्तिजापूर येथून अटक केली. त्यावेळी तो विष प्राशन केलेल्या अवस्थेत होता. नांदण्यास तयार नसलेल्या पत्नीची त्याने त्यापूर्वी सकाळी अमरावतीच्या साईनगर भागात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली.  राहुल बबनराव भड (रा.हंतोडा, ता. अंजनगावसुर्जी) याच्या पाळतीवर असलेल्या अमरावती पोलिसांच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या आधारे मूर्तिजापूर गाठून त्याला अटक केली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुलकडून हत्येसाठी वापरलेला चाकू व वाहन जप्त करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहेत.

अमरावती येथे वास्तव्यास असलेला राहुलने प्रेम प्रकरणातून प्रतीक्षा मेहत्रे या युवतीशी 10 ऑक्टोबर 2013 रोजी गुपचूप लग्न उरकले. यशोदानगरातील देव महाराज संस्थानात हिंदू रितीने विवाह पार पडला. यासंबंधाने त्याने नोटरीसुद्धा केली आहे. मात्र, यानंतर प्रतीक्षा तिच्या माहेरीच राहत होती. दोघांनी लग्न केल्याचे प्रतीक्षाच्या आई-वडिलांनाही माहिती नव्हते. यादरम्यान एकदा राहुलने प्रतीक्षाला मागणी घातली. मात्र, तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. राहुलने प्रतीक्षाच्या कुटुंबीयांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा विरोध ठाम होता. प्रतीक्षानेही राहुलसोबत जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे राहुलने  प्रतीक्षासोबत लग्न झाल्याचा दावा करीत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण नेले. एक तर नांदायला ये, नाही तर सोडचिठ्ठी दे, असे त्याने कळविले. दुसरीकडे तिचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. या कालावधीत प्रतीक्षाने राहुलविरोधात पाच पोलीस तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे राहुलच्या मनात प्रचंड राग धुमसत होता. 

हत्येपूर्वी प्रतीक्षाच्या वडिलांना धमकी प्रतीक्षाच्या हत्येच्या एक दिवसापूर्वी राहुलने पुन्हा तिच्या वडिलांना धमकी दिली. याबाबत फे्रजरपुरा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. यानंतर गुरुवारी राहुलने प्रतीक्षाला साईनगरातील वृंदावन कॉलनी परिसरात गाठले आणि चाकूचे नऊ वार करून तिची हत्या केली.  

टॅग्स :MurderखूनAmravatiअमरावती