शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

त्रिमूर्ती जंगल कामगार संस्थेत लाखोंचा अपहार

By admin | Updated: January 28, 2017 00:20 IST

तालुक्यातील जारीदा येथील त्रीमूर्ती जंगल कामगार संस्थेमध्ये ५३ लक्ष रूपयांची अफरातफर केल्या प्रकरणी

लेखापरीक्षकांची तक्रार : संचालक मंडळाविरुद्ध गुन्हाचिखलदरा : तालुक्यातील जारीदा येथील त्रीमूर्ती जंगल कामगार संस्थेमध्ये ५३ लक्ष रूपयांची अफरातफर केल्या प्रकरणी तत्कालीन सचिव मधुकर कृष्णाजी येवलेसह संचालकाविरुद्ध पोलिसांनी विविध गुन्हे नोंदविले असून इतरही संस्थांतर्गत केलेल्या अपहाराचे प्रकरण दडपण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. मेळघाटात आदिवासी मजुरांना कामे मिळावीत. यासाठी आदिवासी जंगल कामगार संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. सागवानाची वृक्षतोड झाल्यावर दहा टक्के अधिदान रक्कम शासनातर्फे संस्थेला दिली जाते. कोट्यावधी रुपयांच्या यारकमेतून सभासदांना सामूहिक आणि वैयक्तिक अधिदान वस्तूस्वरुपात वाटप करावे लागते. सोबतच संस्थेचा हिशेब व्यवस्थित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, जारिदा येथील त्रिमूर्ती जंगल कामगार संस्थेमध्ये तत्कालीन सचिव मधुकर कृष्णाजी येवले (६२) याने मोठ्या प्रमाणात शासकीय निधीची अफरातफर केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे.माहिती देण्यास टाळाटाळमधुकर येवले हा त्रिमूर्तीसह इतरही काही जंगल कामगार संस्थांचा तत्कालीन सचिव होता. त्यामुळे जारिदा येथील त्रिमूर्ती संस्थेत सन २०११ ते २०१४ त्याने तब्बल ५३ लक्ष रुपयांची अपरातफर केल्याचे अचलपूर येथील सहकारी संस्थाचे लेखापरीक्षक संजय पारपिल्लेवार यांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आले. संबंधित सचिव मधुकर येवले यांना वारंवार संबंधित कागदपत्रे व माहिती मागितली असता टाळाटाळ करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. परिणामी संस्थेचा ट्रक परस्पर विकणे, हिशेबाची कागदपत्रे सादर न करणे, आदिवासींना त्यांचा लाभ न देणे आदी गंभीर नोंदी घेत चिखलदरा पोलिसांत लेखापरीक्षक संजय पारपिल्लेवार यांनी फिर्याद दिली. त्यावरुन सचिव मधुकर येवलेसह संचालक मंडळाविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०८, ४०९, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जंगल कामगार सहकारी संस्थांतर्गत शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधीची अफरातफर करण्यात आल्याची तक्रार यापूर्वी वारंवार करण्यात आली होती. मात्र लेखापरीक्षकांनीतत्कालीन सचिव मधुकर येवलेचे प्रकरण फाईल बंद केल्याची माहिती आहे. पुन्हा त्यांच्या चौकशीची मागणी होत असून जंगल कामगार संस्थेचा सन २०११ ते २०१४ चे लेखापरीक्षणात ५३ लक्ष रुपयांची अफरातफर असताना इतर आकडा कोट्यवधी रुपये असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.