शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

रस्त्यावर मध्यरात्री बर्थ डे पार्टी करणाºयांची ठाण्यात पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:03 PM

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले.

ठळक मुद्देनाईट राऊन्ड सीपींचा : सीआर व्हॅनमधील पोलीस काढत होता झोपा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले. सीपींनी त्या तरुणांना खडसावत दोघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यातही घेतले. त्यातच नाईट राऊन्डदरम्यान सीआर व्हॅनची तपासणी करून पोलिसांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीवर वचंक निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्वत रात्रगस्त सुरु केली. या रात्रकालीन गस्तीदरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर लक्ष केंद्रीत केले. त्या दृष्टीने सुधारणा केल्यात. दरम्यान घरफोडीच्या सत्राने पुन्हा सीपींनी रात्रकालीन गस्त घालून पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधारणा केली. शुक्रवारी रात्री १२ वाजता सीपींचा शहराचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम गाडगेनगर रोडवर त्यांना काही तरुण रस्त्यावरच बर्थडे केक कापताना जल्लोष करताना आढळून आले. सीपींचा ताफा थांबताच त्यांतील काही तरुणांनी पळ काढला, तर दोन तरुण पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सीपींनी राठी नगरातील घरफोडीच्या घटनास्थळी भेट देऊन पोलीस गस्तीचा आढावा घेतला. तेथून वडाळीकडे जाताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरही काही तरुण वाढदिवस साजरा करून निघताना आढळले. याबाबत त्यांनी वायरलेसवर संदेश देऊन त्या तरुणांची झडती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार डीसीपी प्रदीप चव्हाण यांनी तरुणांना थांबविले. सीपींनी त्यांची कानउघाडणी करून पुन्हा रात्री न फिरण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतर वडाळी, महादेव खोरी, फ्रेजरपुरा, मोतीनगर, रुख्मिणीनगर, हमालपुरा, गांधी चौक, भुतेश्वर चौक, हिन्दू स्मशानभूमिकडून फेरफटका मारून रात्री ३.३० पर्यंत स्थितीचा आढावा घेतला.शिस्तीत पोलिसिंग करण्याचे निर्देशसीपींना महादेवखोरी मार्गावर सीआर - २ व्हॅन गस्तीवर दिसली. त्यामध्ये लाठी व शस्त्र मागील बाजूस ठेवल्याचे आढळून आले. केवळ वाहनात बसून गस्त लावून काय उपयोग, गाडीबाहेर उतरूनही पायदळ गस्त लावा व व्हिसल वाजवून पोलीस सजग असल्याचे नागरिकांना दाखवा, असे सक्त निर्देश सीपींनी पोलिसांना दिले.सायकल पेट्रोलिंग करणाºया पोलिसांना रिवार्डसीपी मंडलिक यांना फ्रेजरपुरा परिसरात सशस्त्र पोलीस कर्मचारी सायकलवर पेट्रोलिंग करताना आढळून आले. नियमित कर्तव्य बजावत असलेल्या या दोघांना सीपींनी शाबासकी दिली आणि रिवार्ड घोषित केला. त्या पोलिसांच्या कामगिरीवर सीपींनी समाधान व्यक्त केले.