शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटी वृक्ष लागवडीचे मायक्रो प्लॅनिंग, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 23:15 IST

अमरावती : राज्याच्या वनविभागाकडून पुढील वर्षी प्रस्तावित १३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिका-यांचा आढावा घेण्यात आला.

अमरावती : राज्याच्या वनविभागाकडून पुढील वर्षी प्रस्तावित १३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिका-यांचा आढावा घेण्यात आला. यात वृक्षलागवडीबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले.विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीला अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण, अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सामाजिक वनीकरणचे संरक्षक रवींद्र वानखडे, पांढरकवड्याचे उपवनसंरक्षक अर्चना मुंडे, पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, बुलडाण्याचे डीसीएफ भगत, अकोल्याचे डीसीएफ वळवी यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रवीण चव्हाण यांनी विभागात वनजमिनीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करताना वृक्षलागवडीसाठी एकूण जमीन किती, याची रीतसर माहिती विभागीय आयुक्तांना दिली. पुढील वर्षी जुलै महिन्यात १३ कोेटी वृक्षलागवडीसंदर्भात आतापासून शासनाने मायक्रो प्लॅनिंग सुरू केले असून, सर्वच यंत्रणांना सहभागी केले जाणार असल्याची बाब विभागीय आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केली. शाळा, महाविद्यालयांना हरित सेनेची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचा सूचना करण्यात आल्या. जमीन, रोपवाटिका, खुल्या जागांंबाबत चर्चा करण्यात आली. शासनादेशानुसार सामाजिक संघटनांना १३ कोटी वृक्षलागवड या मोहिमेत सहभागी करण्यासाठी नोंदणी वजा संपर्क ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. जिल्हा परिषद, महापालिकांसह अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे विभागप्रमुख आवर्जून उपस्थित होते.रेल्वेच्या रिकाम्या जागांकडे लक्षराज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवले आहे. या अभियानात पहिल्यांदाच रेल्वे प्रशासनाला सहभागी केले जाणार आहे. रेल्वेच्या अतिरिक्त आणि रिकाम्या जागांवर वृक्षलागवड करुन संपूर्ण परिसर वृक्षाच्छादित करण्याचा मानस आहे. रेल्वेकडे रिकाम्या जागांबाबत वनविभागाने माहितीदेखील मागविली आहे. वरिष्ठ वनाधिकारी यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती