शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांचा बडनेºयातील मोदी दवाखाना दुपारी बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:45 IST

येथील मोदी दवाखान्याचे बाह्य रूग्ण विभाग दुपारच्या सुमारास बंद राहत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. दिवसभर दवाखाना सुरू ठेवावा, अशी ओरड आहे.

ठळक मुद्देरुग्णांचे हाल : प्रशासन कधी घेणार दखल ?

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील मोदी दवाखान्याचे बाह्य रूग्ण विभाग दुपारच्या सुमारास बंद राहत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. दिवसभर दवाखाना सुरू ठेवावा, अशी ओरड आहे. गोरगरिबांचा दवाखाना म्हणून त्याची ओळख आहे.मोदी दवाखान्यात नाममात्र दरात रुग्णांवर उपचार होतात. दररोज मोठ्या संख्येत रुग्ण तपासणीसाठी येतात. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत व त्यानंतर सायंकाळी पाच ते सात तपासण्याची वेळ निश्चित आहे. केवळ सहा तासच रुग्णांच्या तपासणीसाठी आहे त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील एकमेव वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. दुपारी १ वाजेनंतर हा दवाखाना सायंकाळपर्यंत बंदच असतो. ग्रामीण रुग्णांना बडनेºयात येण्यासाठी हाच वेळ सोयीचा असल्याने मोदी दवाखान्यात रुग्ण तपासण्यासाठी येतात. दुपारच्या वेळेत विविध गावखेड्यांतून आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागत आहे. भाड्याचा खर्च व उपचाराविना परत जाण्याच्या मन:स्तापाने रुग्ण त्रस्त झाले आहे. हा दवाखाना सकाळी ९ ते रात्री ९ असे १२ तासांचा करावा, असे बडनेरा शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बोलले जात आहे. त्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करावी, ज्यामुळे खासकरवून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सोयीचे ठरेल. बडनेºयातला मोदी दवाखाना हा मीनी इर्विन म्हणून आहे. गोरगरिबांच्या सोयीचा आहे. महापालिका प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवावामोदी दवाखान्यात १५ दिवसांपूर्वी सिरीन्जचा तुटवडा होता. विषाणूजन्य तापाची साथ आहे. सिरीन्ज नसल्याने रुग्णांना बाहेरून विकत आणावी लागली. संबंधित प्रशासनाने त्याची दखल घेतली. मोदी दवाखान्यात गोरगरीब, सर्वसाधारण परिस्थिती असणारे रुग्ण आहेत. औषधांचा तुटवडा होऊ नये, असे रुग्णांमध्ये बोलले जात आहे.