शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन रॅलीतून पर्यावरण संवर्धनचा संदेश

By admin | Updated: January 11, 2016 00:11 IST

भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरण, वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती : दीड हजारांवर विद्यार्थी सहभागीअमरावती : भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जपान येथील मारुहाची टेन्थ कार्पोरेशनचे सीईओे हिताशी सातो, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. आधुनिक युगात वाढणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाची गरज आहे. त्यादृष्ट्रीने श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मिशन आॅलिम्पिक, जपान येथील के-१३६, सामाजिक वनीकरण यानी संयुक्तारित्या ग्रीन रॅलीचे आयोजन केले. रविवारी सकाळी ८.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत सायकलवर जपानचे इसाम कियामा, ताजीमा कोशिओ, जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत, डेनमार्कचे फिन बेडग्रन, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भीमराव खंडाते, गणेश मालटे, प्रायार्च स्मिता देशमुख, नगरसेविका नीलिमा काळे, सुजाता सभानेसह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रात भाऊसाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करून रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी पंचवटी चौकात पर्यावरणाविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. पंचवटी चौकातून निघालेली रॅली गर्ल्स हायस्कूल चौक, मालटेकडी, राजकमल चौक, राजापेठ मार्गे परत इर्विन चौक येथून श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात नेण्यात आली. त्या ठिकाणी रॅलीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसुळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून ग्रिन रॅलीच्या आयोजनाबाबत आयोजकांचे कौतुक केले. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय वायू सेनेतून निवृत्त झालेले दीपक आत्राम, के-१३६ चे इंडिया हेड शशांक वाडेकर, संयोजक चेतन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रॅलीचे व्यवस्थापनाची जबाबदारी स्काऊटच्या ५२ विद्यार्थ्यांनी सांभाळली. त्यामध्ये टिम प्रमुख प्रतीक कुऱ्हेकर यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्तविक चेतन राऊत, संचालक निकिता सेवक व अनिरुध्द महाजन तर आभार प्राचार्य स्मिता देशमुख यांनी केले. (प्रतिनिधी)अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादग्रीन रॅली शहरातील विविध मार्गांवरून जात असताना अमरावतीकरांसाठी लक्षवेधी बनली होती. रॅलीत सहभागी असणाऱ्या सायकलस्वारांना मार्गावरील हातवारे करून चांगल्या उपक्रमासाठी दाद दिली. तसेच ग्रीन अमरावतीचा घोषणा सुध्दा केली. ग्रीन अमरावतीच्या संदेशासाठी विद्यार्थी फलकांसह वन्यप्राण्यांच्या वेशभूषेतग्रीन रॅलीत सहभागी झालेल्या तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाच्या विषयी विविध फलके हाती घेऊन जनजागृती केली. निसर्ग वाचवा, झाडे लावा, वाघ जंगलाची शान आहे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हे जीवन, स्वच्छ भारत सुंदर भारत असे विविध फलके विद्यार्थ्यांच्या हाती होती. तसेच वाघ, सिंह, माकडासह अन्य वन्यप्राण्याच्या वेषभूषा विद्यार्थी होते. त्यामुळे या रॅलिला आगळवेगळे स्वरुप आले होते.