शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

आठवणीतील निवडणूक;  अन् प्रतिभाताई अमरावतीतून झाल्या खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:17 IST

अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला.

ठळक मुद्देसहानुभूतीची लाट १९९१ च्या निवडणुकीत प्रकाश भारसाकळेंची हुकली संधी

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. शिवसेनेचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि मतदान पाच आठवडे पुढे ढकलले गेले. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे भारसाकळे ऐनवेळी मागे पडले आणि प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला.१९९० मध्ये प्रकाश भारसाकळे प्रथमच दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. जिल्ह्यात शिवसेनेची चांगलीच बांधणी झाली होती. लोकसभा निवडणूक लागली तेव्हा प्रकाश भारसाकळे यांच्या आमदारकीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर विश्वास टाकून लोकसभेची उमेदवारी दिली. प्रचाराला रंग चढला. शिवसेनेने आघाडी घेतली. प्रकाश भारसाकळे खासदार होणार, असे वातावरण तयार झाले. टक्कर काट्याची होईल. यावेळी काँग्रेसने सावध असावे, असे काँग्रेसजनांनाही वाटत होते. मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच २१ मे रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर देशभर दुखवटा पाळला गेला. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा बदलल्या. काँग्रेस पक्षाबद्दल देशभर सहानुभूतीची लाट तयार झाली. प्रचारात शिवसेना मागे पडली. प्रकाश भारसाकळे यांना दुसऱ्या क्रमांकाची १ लाख २१ हजार ७८४ मते मिळाली. प्रतिभाताई पाटील यांना ५५ हजार ४८१ मतांचा लीड मिळाला. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले मावळते खासदार सुदामकाका देशमुख यांनी तिसऱ्या क्रमांकाची ९२ हजार ४८ मते घेतली. या निवडणुकीप्रमाणेच एकूण २४ उमेदवार त्यावेळी रिंगणात होते. राजीव गांधी सुखरूप असते आणि निवडणूक नियोजित तारखांना पार पडली असती, तर शिवसेनेने या मतदारसंघात १९९१ मध्येच पहिला विजय नोंदवला असता, अशी आठवण राजकीय जाणकार आजही सांगतात.प्रतिभा पाटील यांना मेळघाट विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक ४२ हजार ८१६ मते मिळाली, तर प्रकाश भारसाकळे यांना १३ हजार ४७३ मते मिळाली होती. शिवसेनेला साथ करणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातही प्रतिभाताईना आघाडी मिळाली. त्यांनी या मतदारसंघात ३८ हजार ३६२ मते घेतली, भारसाकळे यांना २३ हजार ३७४ मते मिळाली होती. मागील निवडणुकीत सुदामकाका देशमुख यांच्या रूपाने भाकपला गेलेला अमरावतीचा गड प्रतिभाताईनी सर केला.४ लाख २५ हजार झाले होते मतदाननिवडणुकीत एकूण ४ लाख २५ हजार ५०९ मतदान झाले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ८०५ वैध मते होती. या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाचे अमिरखाँ हमीदखाँ यांना १ हजार ४६७, जनता पार्टीचे सुरेंद्र भुयार यांना १ हजार ५८८, तर बसपाचे महादेव कळसकर यांना ४ हजार ५६ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार दिलीप भीमराव वाटाणे यांना ६ हजार १३५ मते मिळाली होती. इतर अपक्ष उमेदवार ‘किस गली मे खसखस’ होते.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटील