शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटाने पहिल्यांदाच अनुभवली कामकाजाची अचूक वेळ; अधिकारी, कर्मचारी डेरेदाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 18:03 IST

सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणाºया शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले.  

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणा-या शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले.  महिन्यातून एखाद्या दिवशी दर्शन देणारे ग्रामसेवक विविध विभागाचे कर्मचारी चक्क रविवारपासूनच मेळघाटात मुक्कामी आल्याने गावकºयांनासुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 'ड्रिम मेळघाट क्लिन मेळघाट'मध्ये अख्खे जिल्हा प्रशासन सोमवारीपासून धारणी व चिखलदा तालुक्यात मुक्कामी असल्याने त्याचा धसका शाळाही अगदी वेळेवर उघडून त्यात शिक्षक उपस्थित झाले. जिल्हा परिषदेच्यावतीने दुसºया टप्प्यात मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शौचालय निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे दीडशेवर अधिकारी, हजारा७वर कर्मचारी तीन दिवस मेळघाटात ठाण मांडून आहेत. एका उद्दिष्टपूर्तीनंतर ते बाहेर निघणार आहेत. 

बहोत दिनो के बाद दिखा रे साहेबोनमेळघाटात सुविधांची वानवा आहे. येथे नियुक्ती म्हणजे अनेकांच्या मनी काळ्या पाण्याची शिक्षाच. यामुळे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कामकाजाचा दिवस निश्चित करून दौरा काढला जातो, असा प्रकार येथे सर्रास दिसून येतो. जि.प. प्रशासन शौचालय बांधकामासाठी तीन दिवसांच्या मिशनवर असल्याने ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, नरेगा आदी सर्वच विभागाचे मेळघाटातील कर्मचारी रविवारपासून मुख्यालयी उपस्थित आहेत. यामुळे शाकीय कार्यालये वेळेत सुरू झाली. आवागड येथे तर ‘‘आज कसा आये रे साहेब बहोत दिनो बाद दर्शन दिया’’ असा टोला आदिवासी कर्मचा-याकडे पाहून लागवत असल्याचे चित्र अनुभवता आले. 

वेळेवर वाजली शाळेची घंटा मेळघाटातील बहुतांश शाळा मनात येईल तेव्हा उघडल्या जात असल्याचे चित्र गत आठवड्यात चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी बंद शाळेचा सेल्फी घेऊन उघडकीस आणले होते. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. परंतु सोमवारपासून शिक्षकांची उपस्थिती आणि शाळांची घंटा, प्रार्थना, चवदार खिचडी, स्वच्छता आदी सर्व बाबी सुरळीत होत आहेत. 

मेळघाटात ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी मुक्कामी असल्याचा आनंद आहे. शौचालय बांधकामाप्रमाणेच इतरही योजना कामे याचप्रमाणे झाल्यास आदिवासींना खरा लाभ मिळेल. - नानकराम ठाकरे, उपसभापती पं.स. चिखलदरा

टॅग्स :Amravatiअमरावती