शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात परिचारिकेने डॉक्टरला चपलेने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 11:59 IST

Amravati News मेळघाटात टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रात कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केली. यामुळे तिने त्याला चपलेने चांगलेच चोपले.

ठळक मुद्देदवाखान्यातच दारू ढोसून अश्लील शिवीगाळटेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रातील घटना

नरेंद्र जावरे

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रात कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दारू पिऊन परिचारिकेला अश्लील शिवीगाळ केली. यामुळे तिने त्याला चपलेने चांगलेच चोपले. यासंदर्भात तक्रार देण्यात आलेली नाही. तथापि, अश्लील शिवीगाळीची ध्वनिफित वायरल झाली आहे. लोकमतकडे काहींनी ती पाठविली. दुसरीकडे आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ जुलैच्या रात्री एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दवाखान्यातच यथेच्छ दारू ढोसली. यादरम्यान एका परिचारिकेला अश्लील शिवीगाळ करीत असल्याने उपस्थित कर्मचाऱ्याने ‘त्या’ डॉक्टरला समजावले. मात्र, तो कुणालाही जुमानत नव्हता . प्रकरण अंगलट येणार असल्याचे पाहून १४ जुलैला रात्री २ वाजता आपली चारचाकी घेऊन डॉक्टरने पोबारा केला. १९ जुलैला परत आला. दुपारी ३ च्या सुमारास अश्लील शिवीगाळ करणारा डॉक्टर आल्याचे माहिती होताच महिला परिचारिकेने त्याला चपलेचा ‘प्रसाद’ दिला. तेव्हापासून डॉक्टर बेपत्ता असल्याची माहिती आहे.

मी करोडपती आहे...

आय एम ... एमओ हीअर.... मी फॉरेनमध्ये फिरणारा माणूस आहे... मी करोडपती आहे... तुमच्याने जे होते, ते तुम्ही करून घ्या. माझी तक्रार करा... मी... डॉ... बेकार आहे, असे डीएचओला सांगा. त्या..... बाईचं काय करायचे... मी पण काही बांगड्या थोडी घातल्या आहेत... माझ्याशी पंगा कायले घ्यायला पाहिजे.... अशी त्या डॉक्टरची अश्लील शिवीगाळ असलेली ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. मात्र, त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

आपण या काळात सुटीवर होतो. कुठल्याच प्रकारची तक्रार अद्याप आलेली नाही. एक डॉक्टर अनधिकृतपणे गैरहजर आहे. आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही आहे. सदर प्रकार घडल्याची चर्चा आपल्यासुद्धा कानावर आली. तक्रार येताच संबंधितांविरुद्ध वरिष्ठांना सांगून कारवाई करण्यात येईल.

चंदन पिंपरकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टेम्ब्रुसोंडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी