शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट पुन्हा दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा या गावांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. पाळीव प्राणी व अनेक आदिवासी महिला-पुरुषांवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देपंचक्रोशी हादरली : मोथाखेड्यात वाघाच्या हल्ल्याने ई-वन वाघिणीच्या आठवणी ताज्या

पंकज लायदे।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : वनविभागाने ब्रम्हपुरीच्या जंगलातील २६ महिने वयाची ई-वन वाघिण मेळघाटच्या डोलार जंगलात सोडली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात त्या वाघिणीने एका जणाचा बळी घेतल्यानंतर पकडून तिची प्राणीसंग्रहालयात रवानगी करण्यात आली. पंचक्रोशीतील डझनभर गावांनी त्यावेळी अनुभवलेली दहशत संपुष्टात येत असतानाच, रविवारी मोथाखेड्यात वाघाने आदिवासी शेतक ऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे राणीगाव, गोलाई, पलसकुंडी, मोथाखेडा येथील शेतकरी बांधवांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा या गावांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. पाळीव प्राणी व अनेक आदिवासी महिला-पुरुषांवर हल्ला चढविला. ई-वन वाघिणीने दादरा येथील शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मंत्रालयातून या वाघिणीच्या बंदोबस्ताचे आदेश निघाले. त्यानंतर तिला नागपूरजवळच्या गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले. ती दहशत आदिवासी या नव्या वाघाच्या हल्ल्यानंतर पुन्हा अनुभवत आहेत.धूळघाट रेल्वे व गोलाई वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची गावालगतच्या जंगलात गस्त सुरू आहे. तूर्तास वाघ आढळून आलेला नाही. तो जंगलाकडे गेला असल्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिसरातील परिस्थिती आटोक्यात आहे.योगेश तपास, वनपरिक्षेत्र अधिकारी, धूळघाट रेल्वे

टॅग्स :TigerवाघMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प