शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:39 IST

आदिवासींचा सर्वात मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे शेकडो आदिवासींनी रुढीप्रमाणे मेघनाथ यात्रेत पूजाअर्चा करीत नवस फेडले. पान-विडाच्या दुकानात आदिवासी युवक युवतींना पसंती दर्शवित लग्नाच्या बेडीत अडकले.

ठळक मुद्देपारंपरिक यात्रा : अनेकांनी फेडला नवस, एका विड्यात आटोपले लग्न

नरेंद्र जावरे/मारोती पाटणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा/ चुरणी : आदिवासींचा सर्वात मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे शेकडो आदिवासींनी रुढीप्रमाणे मेघनाथ यात्रेत पूजाअर्चा करीत नवस फेडले. पान-विडाच्या दुकानात आदिवासी युवक युवतींना पसंती दर्शवित लग्नाच्या बेडीत अडकले.रावणपुत्र 'मेघनाथच्या नावाने मेळघाटात आजही वंशपरंपरागत यात्रा भरते. जारिदा व काटकुंभ येथे परिसरातील डोमा, काजलडोह, बामदेही, बगदरी, कनेरी कोयलारी, पाचडोंगरी, खंडूखेडा, चुनखडी खडीमल, माखला, गंगारखेडा, कोटमी, दहेंद्री, पलस्या, बुटीदा, चुरणी, कोरडा, कालिपांढरी आदी ५० ते ६० गावांतील आदिवासी व गैरआदिवासींनी यात्रेत हजेरी लावली. घरातील लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आजारी पडला तर गावातील मांत्रिकाकडे जाऊन प्रथम उपचार केला जातो.पान विड्यात लग्न, ढोल-ताशे, नगारेढोल, नगारे, डफली, ताशे वाजवित गदली नृत्याने यात्रेची रंगत वाढविली जाते. त्यासाठी बगदरी, काजलडोह, कोटमी, कोयलारी, पलासपानी येथील पथक कार्यरत असते. युवक-युवती एकमेकाला पसंत करून व मीठापान देऊन पळून जातात. आई-वडील मुलीला शोधून पंचासमक्ष हुंडा ठरविण्याची पद्धत रुढ झाली आहे.खांबाला बांधून प्रदक्षिणा, शेकडो नारळ फुटलेज्यांनी नवस कबूल केला. तो पूर्ण झाल्यानंतर मेघनाथबाबाजवळ बसलेल्या भूमकाकडे पूजा-अर्चा केली जाते. तेथे ऐपतीप्रमाणे कोंबडा किंवा बोकूड दिला की आडव्या खांबाला नवस कबूल करणाºयास बांधले जाते. खाली दोन इसम त्या दोरीच्या साह्याने सहा प्रदक्षिणा घालतात. तीन वेळा सरळ व विरुद्ध दिशेने प्रदक्षिणा घातल्या जातात. नवसफेड करून पूजेची समाप्ती होते.