शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भपंढरीत भाविकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:31 IST

भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले.... आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले.... तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे... पांडुरंगा, माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...

ठळक मुद्देश्रीक्षेत्र कौंडण्यपूर : वशिष्ठा नदीत स्नान, २८ ला दहीहंडी

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा :भक्तीच्या वाटेवरगाव तुझे लागले....आशीर्वाद घेण्यासमन माझे थांबले....तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे...पांडुरंगा, माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रचलित कौंडण्यपूर येथे पांडुरंगाच्या सहवासाची, दर्शनाची आस लागलेल्या भक्तांनी दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासून रांग लावली होती. सायंकाळपर्यंत सुमारे १५ हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन या माउलीचे रूप डोळ्यांत साठवले.देवी रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर येथे वर्षभर भाविकांची गर्दी राहते. पंढरपूरचे प्रतिरूप असे कौंडण्यपूरला म्हटले जाते. पंढरपूरला पायी जाणारी राज्यातील सर्वांत पहिली पालखी येथील असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दिंडीसोबत जातात. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना प्रतिपंढरपूरला ओढ असते. त्यामुळे वशिष्ठा (वर्धा) नदीच्या काठावरील अतिप्राचीन मंगळवारी पहाटेपासून गजबजले होते. भाविकांची गर्दी सहा दिवस कायम राहणार आहे.कौंडण्यपूरला आषाढी एकादशीची महापूजा सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. पहिल्या पूजेचा मान आर्वी येथील सत्यनारायण चांडक व अमरावती येथील गुल्हाने दाम्पत्याला मिळाला. यावेळी पुजारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व भाविक उपस्थित होते.मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी होती. यावेळी मंदिरात लगतच्या गावांतील महिला व पुरुषांची भजनी मंडळांनी गीत व भजन गायन केले. बेनोडा येथील वारकरी पालखी भजनी मंडळ, आर्वी येथील शीतलामाता भजनी मंडळ, अंजनसिंगी येथील कान्होजी महाराज भजनी मंडळ आदी सर्व मंडळांच्या भजनांमुळे भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली. या सर्व भजनी मंडळांचे संस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे यांनी दिली.कुऱ्हाचे ठाणेदार सुनील किनगे, पीएसआय नंदा वैश्य, आशिष चौधरी, मंगेश पेठे, कॉन्स्टेबल हनुुमानसिंग ठाकूर, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सर्व भाविकांना पूजेचा मान असणाऱ्या परिवाराद्वारा फराळाचे वाटप करण्यात आले.नौकाविहाराचा आनंदभाविकांनी वर्धा नदीत स्नान केले तसेच नौकाविहाराचा आनंद लुटला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतीरावर सुरक्षा ठेवण्यात आली होती.दहीहंडीने समाप्तीआषाढी एकादशीच्या यात्रेची समाप्ती पाडव्याला २८ जुलै रोजी काल्याचे कीर्तन व गोकुळपुरीत ४.३० वाजता दहीहंडी होणार आहे. या दहीहंडीला विदर्भातून सात ते आठ हजार भाविक वारकरी उपस्थित राहतील.