शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

शेतीची यांत्रिक मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर; अवजारांची बँक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:29 IST

Amravati News शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्दे डिझेलचा दर - ८६.५४ रुपये गतवर्षी नांगरणी - ५०० रुपये प्रतिएकर यंदा नांगरणी - ७०० रुपये प्रतितास

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :  शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.गतवषार्पेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व तूरदेखील वेळेच्या अगोदर निघाल्याने शेते पूर्णत: रिकामी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या मागे लागला असला तरी डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे आवाक्?याबाहेर झाले असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.एकीकडे डिझेलसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी, असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे.बैलजोड्यांची संख्या घटलीअलीकडे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली आणि सोबतच बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने करू लागला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक गावात दहा ट्रॅक्टरच्या वर अधिक संख्या झाली आहे. प्रत्येक शेतकरी नांगरणी, वखरणीच नव्हे, पेरणी व पिकांना फवारणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने करीत आहेत.रासायनिक खताचा वापर होत असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी जमिनीचा कडकपणा वाढला. त्यामुळे बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी केली, तर फायद्याचे ठरते. यंदा त्याचा दरही वाढला आहे.- राजू झलके, जळगाव आर्वीडिझेलचा दर गतवर्षी प्रतिलिटर ६७ रुपयांच्या आसपास होता. तो आता ८६ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रतिएकराचा मोबदला आता प्रतिलिटरवर गेला आहे. शेतकऱ्यांनी ८० टक्के मोबदला दिला, तर काही तरी शिल्लक पडेल.- महेंद्र इंगळे, कावली वसाडएकल शेती करण्याऐवजी अवजारांची बँक गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केल्यास शेतीच्या खचार्चा भार वहन करणे सोपे जाईल. हा विचार बोलून दाखवण्याऐवजी लवकरात लवकर कृतीत आणावा लागेल.- सूरज शिसोदे, नायगाव

टॅग्स :agricultureशेती