बीओटीवर साकारले : वाहनतळाची जागा गिळंकृत, जयस्तंभ चौकात कारवाईअमरावती : महापालिका प्रशासनाने स्थानिक जयस्तंभ चौकात ‘बीओटी’ तत्त्वावर साकारलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचे मोजमाप शुक्रवारी करण्यात आले. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार हे मोजमाप करण्यात आले असून सहायक संचालक नगररचना विभागाची चमू या संकुलाचा मंजूर नकाशा घेऊन घटनास्थळी दाखल झाली होती, हे विशेष.६ सप्टेंबर १९९२ साली हे संकुल ‘बीओटी’ तत्त्वावर साकारण्यास मंजुरी देण्यात आली होती. ३० वर्षांच्या करारनाम्यावर हे संकूल निर्माण करण्यात आले असले तरी संकुलातील बहुतांश बांधकाम नियमबाह्य पध्दतीने करण्यात आल्याचे शुक्रवारी झालेल्या मोजणीअंती स्पष्ट झाले. या भव्यदिव्य संकुलातील गाळेधारकांची संख्या किती?, ही माहिती महापालिका बाजार व परवाना विभागालादेखील नसल्याचे आता स्पष्ट झाले. खत्री कॉम्प्लेक्सनंतर प्रियदर्शनी संकुलात मोठे घबाड आढळल्यास आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा आहे. या संकुलाच्या वरच्या माळ्यावर प्रशस्त हॉल, स्वतंत्र कक्ष आणि काही डिझाईन मंजूर नसल्याचे नाकाशातून दिसून आले. या संकुलात गाळेधारकांना लिफ्ट व वाहनतळाचा वापर करण्यास कंत्राटदारांनी मनाई केल्याची बाब समोर आली आहे. ‘प्रिंसेस’ची मोजणी संशयास्पदप्रियदर्शनी संकुलाच्या दर्शनी भागात ‘बीओटी’ कंत्राटदार वासू खेमचंदानी यांनी साकारलेल्या ‘प्रिंसेस शो-रुम’ ची मोजणी करण्यास चमुला नकार दिला. यावेळी छायाचित्रकार, पत्रकारांनाही शो-रुममध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे प्रिसेंसचे बांधकाम नियमबाह्य असल्याचा दाट संशय महापालिका चमूला आला आहे. ‘प्रिसेंस’ची मोजणी का करु देत नाही?, यावरून अधिकाऱ्यांशी वाद सुरू असताना बरीच गर्दी उसळली होती. प्रतिष्ठानाचे तळमजल्यावर अतिक्रमण असून स्टोअररुमचा वापर व्यापारी हेतुसाठी केला. वाहनतळाचा वापर खासगीरित्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.लॅन्ड स्केपिंग, वाहनतळही अतिक्रमितप्रिंसेस शो रुम समोर तयार करण्यात आलेले लँन्ड स्केपिंग आणि वाहनतळ हेदेखील अतिक्रमित असल्याचे मोजणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. या लँन्ड स्केपिंगला महापालिकेतून परवानगी नसून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष परवानगीने साकारण्यात आल्याचे संचालक सांगतात. वाहनतळाच्या जागेवर वाणिज्य वापर केला जात आहे.
प्रियदर्शनी संकुलाचे मोजमाप
By admin | Updated: October 17, 2015 00:19 IST