झोलाछाप झाला एमडी डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:01:10+5:30

नितीन गोंडाणे यांनी तेथेच कार्यरत भावाला विचारणा केली. त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे नितीन गोंडाणे यांनी डबलेला वारंवार विचारणा केली. अखेर त्याने आपण डॉक्टर नसल्याची कबुली दिली. तसा कबुलीनामासुद्धा लिहून दिला. त्यांच्या तक्रारीवरून ठाणेदार पुंडलिक मेश्राम, दुय्यम ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या पथकाने शनिवारी अविनाश डबलेला अटक केली.

MD Doctor was shocked! | झोलाछाप झाला एमडी डॉक्टर!

झोलाछाप झाला एमडी डॉक्टर!

Next
ठळक मुद्देकिरणनगरात थाटले क्लिनिक । दोन वर्षांपासून नागरिकांवर ‘प्रॅक्टिस’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एमडी ही पदव्युत्तर पदवी धारण करून रुग्णसेवेचा आव आणणाऱ्या किरणनगरातील बोगस डॉक्टरने दोन वर्षांपासून अनेक नागरिकांवर ‘प्रॅक्टिस’ केली. त्याचा बनावटपणा शनिवारी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या युवकाने उघड करून त्याला गजाआड केले.
अविनाश वसंत डबले (३८ रा. भवते ले-आऊट) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. फ्रेजरपुरा हद्दीतील किरणनगर नं. २ येथे त्याचे क्लिनिक आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४९९, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती महानगरपालिका व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्याच्या कागदपत्रांची खात्री करून घेतली जात आहे. अविनाश डबले हा दोन वर्षांपूर्वी सर्वज्ञ हेल्थकेअर फाऊन्डेशन अंतर्गत बेनोडा येथील शांतीनगरात क्लिनिक चालवित होता. त्याने क्लिनिकमध्ये ‘डॉ. अविनाश वसंत डबले एम.डी. (मेडिसिन)’ असे मोठे फलक लावून ठेवले होते. दहा दिवसांपूर्वी डबलेने बेनोडातील क्लिनिक किरणनगर क्रमांक २ येथे शिफ्ट केले.
पोलीस सूत्रांनुसार, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले नितीन रमेश गोंडाणे (२७, रा. उत्तमनगर) हे वडिलांना रक्तदाबाच्या उपचारासाठी अविनाश डबलेच्या शांतीनगरातील क्लिनिकला घेऊन गेले होते. त्यांची वहिनी पूजा सतीश गोंडाणे यांचासुद्धा तेथे उपचार सुरूहोता. डबलेने सन २००४ मध्ये नागपूर जीएमसीमधून शिक्षण घेतले होते. नितीन गोंडाणे यांनी तेथेच कार्यरत भावाला विचारणा केली. त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे नितीन गोंडाणे यांनी डबलेला वारंवार विचारणा केली. अखेर त्याने आपण डॉक्टर नसल्याची कबुली दिली. तसा कबुलीनामासुद्धा लिहून दिला. त्यांच्या तक्रारीवरून ठाणेदार पुंडलिक मेश्राम, दुय्यम ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या पथकाने शनिवारी अविनाश डबलेला अटक केली.

पोलीस कोठडीची मागणी
अविनाश डबले हा गेल्या अनेक वर्षांपासून जागा बदलून दवाखाना चालवित आहे. रुग्णांना ‘एमडी मेडिसिन’ नमूद असलेल्या लेटर पॅडवर औषधी लिहून देत होता. तसे शिक्केसुद्धा तयार करून घेतले. पोलिसांनी लेटरपॅड, शिक्के आणि प्रमाणेपत्रे जप्त केली आहे. पीएसआय मंढाळे यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली.
 

Web Title: MD Doctor was shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.