शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार लॉबीकडून महापौरांचे ‘अ‍ॅडव्हान्स’ स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:29 IST

दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देप्रभागनिहाय स्वच्छता कंत्राट : स्थायी समितीला आव्हान

अमरावती : दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे. एकल कंत्राटाची प्रक्रिया होईपर्यंत प्रभागनिहाय स्वच्छतेसाठी अल्प मुदतीची निविदा काढण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, तो प्रस्ताव स्थायीसमोर येऊन मंजूर होण्याची वाट न पाहता अतीउत्साही कंत्राटदार लॉबीने महापौर संजय नरवणेंचे जाहीर आभार मानले.सत्ताधीश अनभिज्ञस्थायीची मोहोर उमटण्यापूर्वी कंत्राटदारांनी असा आततायीपणा करायला नको होता, अशा प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे. स्वच्छता कंत्राटदार संजय माहुलकर, विजय गंगन आणि त्यांच्या सहकाºयांनी बुधवारी दुपारी महापौर व सभागृहनेत्याचे दालन गाठून प्रभागनिहाय कंत्राटासाठी ‘अ‍ॅडव्हान्स’मध्ये आभार मानलेत. कंत्राटदारांच्या शिष्टमंडळात ब्लॅकलिस्ट व टर्मिनेट कंत्राटदारही सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापौर व सभागृहनेत्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत आणि आभार मानणाºया कंत्राटदारांनी नकळत का होईना स्थायी समितीला आव्हान दिल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.स्वच्छता कंत्राटदारांची मनमानी संपविण्यासाठी स्थायी समितीने एकल कंत्राट पद्धतीच्या प्रस्तावाला १६ सप्टेंबरला मंजुरी दिली. तो आमसभेत मंजूर होण्याच्या भीतीने स्वच्छता कंत्राटदारात अस्वस्थता पसरली. हे कंत्राट मल्टिनॅशनल कंपनीला जाऊ नये, यासाठी या लॉबीने जंगजंग पछाडले. सर्वच लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले. मात्र, स्थायीने मल्टिनॅशनल कंपनीवर शिक्कामोर्तब केल्याने या कंत्राटदारांच्या पायाखालची वाळू सरकली. तथापि दोन दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून ‘प्रभागनिहाय’चा ‘सहामाही’ निर्णय घेतल्याने या लॉबीचे घोडे गंगेत न्हाले. व निविदा प्रक्रियेचा विषय स्थायीत जाण्यापूर्वी आणि त्याप्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधीच कंत्राटदारांनी भाजप सत्ताधीशांचे आभार उरकून घेतले. प्रशासनाने सहा महिन्यांसाठीच नव्याने निविदा करण्याचा मानस व्यक्त केला असला तरी स्थायी सभापती एकल कंत्राटावर ठाम असल्याने कंत्राटदारांनी मानलेले आभार औटघटकेचे तर ठरणार नाहीत ना, असा सूर उमटत आहे.महापौरांची प्रांजळ कबुलीबुधवारी दुपारी स्वच्छता कंत्राटदार महापौरांच्या दालनात पुष्पगुच्छ घेऊन पोहोचले. एकल कंत्राटाची प्रक्रिया अंतिम होईपर्यंत प्रशासनाने प्रभागनिहाय पद्धतीचा प्रस्ताव ठेवल्याने आभार मानत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. तत्पूर्वी महापौर अनभिज्ञ होते. मात्र, विषय समजल्यानंतर महापौरांनी तो विषय स्थायीचा असल्याचे सांगितले.