एमपीएससी परीक्षा आंदोलनकर्त्यांसह माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना डिटेन करून पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रणित सोनी, बादल कुळकर्णी, धीरज बारबुद्धे, सागर महल्ले, प्रशांत शेगोकार आदी पदाधिकारी पोहोचले. भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या भावना आणि परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णयाविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘डिटेन’ आंदोलकांना समज देऊन सोडण्यात आले.
----------------------
भाजप सरकारच्या काळापासून एमपीएससीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचे काम सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बेरोजगार तरूणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्यबाबताच निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी युवक काँँग्रेसची भूमिका आहे.
- सागर देशमुख, प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस