शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनात लागणार मेळघाटातील मोहाचे कल्पवृक्ष

By admin | Updated: November 4, 2015 00:19 IST

मेळघाटच्या आठवणीचा ठेवा, सन्मानाने सत्काराखातीर दिलेले ‘मोहा’चे रोपटे राजभवनात लागणार आहे.

आठवणींचा ठेवा : हरविलेले वृक्ष शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळनरेंद्र जावरे  चिखलदरामेळघाटच्या आठवणीचा ठेवा, सन्मानाने सत्काराखातीर दिलेले ‘मोहा’चे रोपटे राजभवनात लागणार आहे. मात्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना आमझरी या गावात दिलेले रोपटे एका डी. बी. कारमध्ये गेल्याने ते रोपटे शोधण्याची मोहीम प्रशासनाला राबवावी लागली. चिखलदरा पर्यटन स्थळावर राज्यपाल सी विद्यासागर राव विविध कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. त्यांनी मेळघाटच्या विविध समस्या जाणून घेतल्या. मोथा, आमझरीसह येथील कॉफी मळे, गावीलगड किल्ला, पंचबोल पॉर्इंटला भेटी दिल्या.आमझरी येथे इकोटुरीझम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी आदिवासीसोबत संवादसुद्धा साधला. यावेळी वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय गौड यांनी आमझरी येथील कार्यक्रमात राज्यपालांचे स्वागत करण्यासाठी मेळघाटातील कल्पवृक्ष असलेल्या ‘मोहवृक्ष’ भेट देऊन केले. सोबत इतर अधिकाऱ्यांचेही त्याच पद्धतीने स्वागत करण्यात आले. भेट दिलेली वस्तू राज्यपालांच्या दिमतीला असलेल्या कर्मचाऱ्यांची असते. राज्यपालांच्या ताफ्यात सोबतच्या कर्मचाऱ्यांसाठी अ‍ॅम्बेसिडर कार तैनात होती. त्या कारमध्ये राज्यपालांना सत्काराखातीर दिलेले वृक्षसुद्धा ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी राज्यपाल हेलिकॉप्टरने अमरावती येथे आले. त्यांच्या दिमतीचे अधिकारी सायंकाळी अंबा एक्सप्रेसने मुंबई जाणार आहेत. त्यादरम्यान त्यांनी सर्व साहित्य गोळा करायला सुरुवात केली. मात्र ‘मोहा’ वृक्ष दिसत नसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मोहा वृक्षाची शोधमोहीम राबविली. अखेर ती अ‍ॅम्बेसिडर कारच अमरावती निघून गेल्याचा शोध लागला. राज्यपालांचे मेळघाट दौऱ्यातील पी.आर.ओ. तथा अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, तहसीलदार राजीव सुराडकर यांच्यापुढे राजभवनातील कर्मचारी संजय रॉय, सुधीर माळवेकर, मायकर आदींनी व्यथा मंडली. धिरगंभीर या कर्मचाऱ्यांची व्यथा पाहता या उपरोक्त अधिकाऱ्यांची सूत्रे हलवीत त्या हरविलेल्या मोहवृक्षाचा शोध लावला आणि ती व्यवस्थित असल्याची सुखद बातमी मिळताच या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. हे वृक्ष राजभवनात लावणार !राज्यपाल राव राजभवनात पोहोचल्यावर सर्व विचारणा करत असल्याची माहिती रत्नाकर मायकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे वृक्ष राजभवनात लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.