शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

गणित शिक्षकांना मिळणार आॅनलाईन धडे

By admin | Updated: January 9, 2017 00:16 IST

राष्ट्रीय गणितीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी विद्या प्राधिकरणाने (महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

कार्यक्रम : ‘युनिसेफ’सोबत प्राधिकरणाचा करारअमरावती : राष्ट्रीय गणितीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी विद्या प्राधिकरणाने (महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) नवीन उपक्रम हाती घेतला आहे. खासगी आणि शासकीय शाळांमध्ये प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर गणित शिक्षकांना आॅनलाईन धडे दिले जाणार आहे.गणित विषयांचे प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी २० प्रशिक्षक नेमले असून ते गणिताच्या पूर्णवेळ शिक्षकांना आॅनलाईन धडे देणार आहे. सहा महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी विद्या प्राधिकरणाने युनिसेफसोबत करार केला आहे. मार्गदर्शक प्रशिक्षक हे गणित विषयाच्या पूर्णवेळ शिक्षकांना वेबकॉम, ई-मेलद्वारे संवाद साधणार आहे. त्यामुळे गणित शिक्षकांना त्यांच्या संदर्भ साहित्य आणि वैयक्तिक माहितीचे नियोजन करता येणार आहे. दृकश्राव्य साधने उपलब्ध केल्यामुळे एकादी संकल्पना लवकर समजण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शिक्षकांना गणिताचे धडे तर मिळणारच आहेत. याशिवाय राष्ट्रीय गणितीय पाहणीत पहिल्या क्रमांकावर येण्यास मदत होणार आहे. वाढत्या स्पर्धेमुळे गणित विषयांचे अनेकदा शिक्षकांना अडचणी सोडविणे कठीण होते. मात्र आॅनलाईन प्रशिक्षणामुळे वेळीच मार्गदर्शन मिळणार असल्याने ते सोयीचे होणार आहे. गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये विद्यार्थी मागे राहत असल्याचे यापूर्वी झालेल्या सर्वेक्षण आणि निकालानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. गणित विषय म्हटले की विद्यार्थ्यांना थोडासा कंटाळा येतो. मात्र विद्या प्राधिकरणाने विद्यार्थी, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गणित शिक्षकांना तज्ज्ञांचे आॅनलाईन मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)गणित विषयांच्या शिक्षकांची यादी मागविलीखासगी व शासकीय शाळांमध्ये पूर्णवेळ गणित विषयांच्या शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने मागविली आहे. शिक्षण उपसंचालकांकडे त्याअनुषंगाने पत्र प्राप्त झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा उपक्रम गणित शिक्षकांसाठी अतिशय लाभदायक ठरणारा आहे.गणित विषयांच्या शिक्षकांना तज्ज्ञांकडून आॅनलाईन मार्गदर्शन मिळणार असल्याने ही बाब भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य ठरणारी आहे. अद्यापपर्यंत वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले नाही. मात्र तसे पत्र आल्यास त्वरेने अंमलबजावणी केली जाईल.- सी. आर. राठोड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक