शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह अधीक्षक पदोन्नती यादीला ‘मॅट’चे ग्रहण, आता तारीख पे तारीख

By गणेश वासनिक | Updated: March 19, 2023 19:58 IST

आठ वर्षांपासून रिक्त पदांचे संकट, चार अधीक्षकांच्या पदोन्नतीचा वाद सर्वांसाठी ठरतेय डोकेदुखी

गणेश वासनिक, अमरावती: राज्याच्या कारागृहातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे नव्याने प्रस्ताव वरिष्ठांनी मागविले असताना मध्यवर्ती कारागृह अधीक्षक पदोन्नतीचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये गेला आहे. त्यामुळे गत आठ वर्षांपासून रिक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू होताच आता ‘मॅट’चे ग्रहण लागले आहे. चार अधीक्षकांच्या पदोन्नतीच्या वादामुळे आता ‘टॉप टू बॉटम’ प्रक्रिया थांबली आहे.

कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी २ मार्च २०२३ रोजी परिपत्रक जारी करून अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची बाब गांभीर्याने घेत रिक्तपदांची संख्या प्रसिद्ध केली. दरवर्षी जानेवारीमध्ये सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते; मात्र गत दोन वर्षांपासून ही यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे जानेवारी २०२१ च्या यादीनुसार १२ मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात सुहास पवार (वर्धा) यांचे सातव्या क्रमांकाऐवजी नवव्या क्रमांकावर नाव प्रसिद्ध झाले. पवार हे १९९२ पासून रूजू असताना त्यांच्यानंतरच्या तीन जणांची नावे सेवाज्येष्ठता यादीत प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे पवार यांनी पदोन्नती यादीलाच ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आहे. सात जण आणि १२ नावे अशी मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांची यादी आहे. त्यामुळे अंतर्गत स्पर्धा वाढली. मध्यवर्ती कारागृह अधीक्षक पदाच्या सातव्या जागेसाठी सुहास पवार (वर्धा), नितीन वायसळ (मुंबई), सुनील धमाळ (पुणे,डीआयजी मुख्यालय) व प्रमोद वाघ (नाशिक)यांच्यात घमासान सुरु झाले आहे.

‘मॅट’मध्ये १३ मार्च रोजी सुनावणी

सुहास पवार यांनी मूळ पदाच्या नियुक्ती तारखेवरून पदोन्नती यादीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आहे. मॅटमध्ये यासंदर्भात १३ मार्च रोजी सुनावणी झाली आहे; पण मॅटचा निकाल काहीही लागला तरी पवार हे उच्च न्यायालयात धाव घेतील आणि कारागृहातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा विषय ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकला जाईल, असे सर्वश्रुत आहे.

दोन जणांवर विभागीय चौकशी

मध्यवर्ती कारागृह अधीक्षक पदांच्या शर्यतीत असलेल्या भारत भोसले (अमरावती), अनुपकुमार कुमरे (नागपूर) यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता यादीतून भोसले, कुमरे बाहेर पडले आहेत. विभागीय चौकशीत अडकलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा ‘तारीख पे तारीख’चा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे निकालाची प्रतीक्षा असताना आता सेवाज्येष्ठतेपासूनही वंचित रहावे लागत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती